मला सुद्धा शिवसेनेकडून उमेदवारीची ऑफर होती:रवी राणा यांचा गौप्यस्फोट; बच्चू कडूंच्या उमेदवारीवर भाष्य करत दिल्या शुभेच्छा

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-30t181851566_1777553364.jpg




महाराष्ट्रातील विधानपरिषदेच्या एकूण 10 जागांसाठी आज राजकीय पक्षांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, ही निवडणूक आता बिनविरोध होण्याचे निश्चित झाले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने ऐनवेळी माजी आमदार बच्चू कडू यांना उमेदवारी जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. दरम्यान, बच्चू कडू यांचे कट्टर प्रतिस्पर्धी मानले जाणारे आमदार रवी राणा यांनी या घडामोडीवर भाष्य करताना एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. विधान परिषदेसाठी शिवसेनेकडून आपल्यालाही उमेदवारीची ऑफर होती, असा दावा राणा यांनी केला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांना आमदारकीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ते म्हणाले, एकनाथ शिंदेंकडून मलाही ऑफर होती. पण मी देवेंद्र फडणवीस यांचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. शिवसेना वाढीसाठी बच्चू कडू यांना एकनाथ शिंदेंनी पक्षात घेतले, तो त्यांचा पक्षाचा निर्णय आहे. त्यामुळे माझ्या बच्चू कडू यांना शुभेच्छा आहेत. आता सगळ्यांनी एकत्र येऊन महायुतीचा धर्म पाळला पाहिजे, जिल्ह्याचा विकास केला पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे. मी देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता पुढे बोलताना रवी राणा म्हणाले, मला सुद्धा काही दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे, संजय राठोड, आशिष जयस्वाल यांनी सांगितले होते की तुम्ही शिवसेनेसोबत या पण मी त्यांना सांगितले की, मी देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकर्ता आहे. राजकारणात आहे तोपर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत निष्ठेने राहील. पण, मी महायुतीत तुमच्यासोबत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे. राजकीय वैर कधीच कायम नसते शिवसेना वाढवण्यासाठी बच्चू कडू सारखा एक चांगला कार्यकर्ता त्यांना मिळाला आहे. राजकारणात कधीच टोकाची भूमिका नसते, लोकसभेमध्ये नवनीत राणांचा पराभव झाला, त्यामध्ये कोणाचा सिंहाचा वाटा होता ते जनतेला माहित आहे. त्यामुळे जनतेने त्यांचा देखील हिशोब घेतला होता, असेही रवी राणा म्हणाले. तसेच त्यामुळे आता महायुती धर्म पाळून लोकसभा-विधानसभा एकत्र येऊन महायुती धर्म पाळला पाहिजे. मला बच्चू कडूचा माझ्या वाढदिवसा दिवशी फोन आला, त्यादिवशी मी त्यांना त्यांच्या शिवसेनेच्या निर्णयाबाबत शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राजकीय वैर हे कधी कायम नसते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *