शिवाजीनगर पोलिसांच्या हद्दीत डीआयजी पथकाची मटक्यावर धाड 

0


नांदेड (प्रतिनिधी)- सदर माहितीवरून,आज दिनांक 30/04/2026 रोजी, पथकाने नांदेड शहरातील नवीन मोंढा भागातील जय गुरुदेव पान शॉप जवळच्या लिंबाचे झाडाखाली छापा टाकला असता, सदर ठिकाणी मटका खेळताना (4) व्यक्ती मिळून आले. यातील सर्व इसमांना ताब्यात घेऊन, त्यांची तपासणी केली असता, त्यांच्याकडे 15,770/- रुपयांची रोकड व 15,500/- रुपयांचे (3) मोबाईल असा एकूण 31,270/- रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. सदर पथकाने ताब्यातील इसमांना, मटका मालकांबाबत विचारपुस केली असता, त्यांनी सदर मटक्याचे मालक हे   1) अब्बास रा.नई आबादी, शिवाजीनगर, नांदेड 2) शेख जमीर, इतवारा, नांदेड व मटका बुकी चालविणारे 3) संजय गायकवाड, रा. भारत गॅस गोडवून जवळ, नवीन मोंढा, नांदेड व 4) ईश्वर जाधव, रा. खोब्रागडे नगर, नवीन मोंढा, नांदेड हे असल्याचे सांगितले. सदरबाबत, मटका खेळणाऱ्या व मटका मालकांविरुध्द ‍शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार कायदा अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु आहे.

सदर कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे यांचेसह पोलीस अंमलदार प्रदिप खानसोळे,संजीव जिंकलवाड, गणेश धुमाळ व कामाजी गवळी यांनी सहभाग घेतला. पथकाच्या उल्लेखनीय कामगिरीबाबत पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी पथकातील अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन करून त्यांना प्रोत्साहित केले आहे.

खबर‘ हेल्पलाइन वरून माहिती द्या : परिक्षेत्रातील अवैध व्यवसायांना पायबंद घालण्यासाठी, पोलीस उप महानिरीक्षक कार्यालयाने ‘खबर’ नावाची हेल्पलाइन सुरू केली असून, नागरिकांनी आपल्या भागात चालणाऱ्या अवैध व्यवसायांची माहिती 91 50 100 100 हा मोबाईल क्रमांक असलेल्या ‘खबर’ या हेल्पलाइन वर फोन करून अथवा व्हाट्सअप मेसेज द्वारे द्यावी, असे आवाहन नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक श्री शहाजी उमाप यांनी केले आहे.


Post Views: 9






Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *