देवी दाक्षायणीच्या चरणी २५ लाखांची देणगी; सोन्या-चांदीचे दागिनेही दान:यात्रोत्सवादरम्यान देवीचे दर्शन घेत भाविकांनी मनोभावे वाहिली मोठी देणगी‎

0
transfar_transfar_transfar_transfar_transfar_app_177747060069f20c8818e9a_1003924551.jpg




प्रतिनिधी | लासूर स्टेशन मराठवाड्याचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वैजापूर तालुक्यातील लासूरगावातील कुलस्वामिनी देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवाची नुकतीच सांगता झाली. यात्रेला आलेल्या भाविकांनी मंदिराच्या दोन्ही दानपेटीत टाकलेली देणगी तसेच सोन्या-चांदीच्या वाहिक वस्तूंची मंदिराच्या सभागृहात मंगळवारी सकाळी दहा वाजता तहसीलदार तथा मंदिराचे पदसिद्ध विश्वस्त सुनील सावंत यांच्या उपस्थितीत तब्बल १६ तास मंदिर प्रशासनाकडून इनकॅमेरा मोजदाद करण्यात आली. मंदिरातील व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे व संतोष शेलारांसह २५ कर्मचाऱ्यांनी तब्बल सोळा तास मोजलेली एकूण रोख रक्कम २५ लाख ४० हजार ४०६ रुपये बुधवारी लासूर स्टेशन येथील एसबीआय बँकेत भरणा प्रक्रिया करण्यात असल्याचे तहसीलदार सावंत यांनी दिव्य मराठीला सांगितले. यात्रा उत्सव कालावधीत पावती पुस्तकाद्वारे एकूण रोख ६ लाख ५ हजार १४६ रुपये प्राप्त झाले, तर सोने व चांदी स्वरूपातील घोडे, पाळणे, खांडेबेंडे इत्यादी सोने वस्तू वजन २२ ग्रॅम व चांदी वस्तू ९०० ग्रॅम चांदीचे खांडेबेंडे ९५० ग्रॅम वाहिक वस्तू मोजणी करून लॉकरमध्ये जमा करण्यात आल्या आहेत. याप्रसंगी पदसिद्ध विश्वस्त तथा वैजापूरचे तहसीलदार सुनील सावंत, व्यवस्थापक विष्णू हरिचंद्रे, पोलिस पाटील बाबासाहेब हरिचंद्रे, तलाठी प्रवीण पाटील, आदिनाथ वाघुडेंसह हंगामी कर्मचारी स्वयंसेवक यांच्यासह मंदिरातील कर्मचारी उपस्थित होते. यंदा नवरात्र उत्सव ते यात्रोत्सवामध्ये आलेल्या भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती. त्यांनी यादरम्यान यथाशक्ती देणगी दिली आहे. यामुळे ही देणगी जमा झाली.पावती पुस्तकाद्वारे एकूण रोख ६ लाख ५ हजार १४६ रुपये प्राप्त झाले, तर सोने व चांदी स्वरूपातील घोडे, पाळणे, खांडेबेंडे इत्यादी सोने वस्तू वजन २२ ग्रॅम व चांदी वस्तू ९०० ग्रॅम चांदीचे खांडेबेंडे ९५० ग्रॅम वाहिक वस्तू मोजणी करून लॉकरमध्ये जमा के ल्या आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत मोजणी नवरात्र ते यात्रेदरम्यान भाविकांच्या दानपेटीतील देणगीतून १९ लाख ३५ हजार २६० रुपये दान देवी दाक्षायणीच्या पदरात आल्याचे तहसीलदार सुनील सावंत यांनी सांगितले. मंगळवारी दुपारी देवी दाक्षायणीच्या मंदिरातील सभागृहात बसवलेल्या पाचही सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत दोन्ही दानपेट्यांतील दानाची मोजदाद करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed