विज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची कामे सकाळच्या वेळीच पूर्ण केली जाणार:वाढत्या उन्हाचा तडाखा लक्षात घेता विज कंपनीचा निर्णय
![]()
मराठवाड्यात विज कंपनीच्या वतीन मान्सूनपुर्व कामे आता सकाळी सात ते आकरा यावेळेतच केली जाणार आहेत. त्यामुळे वाढत्या उन्हाच्या तडाख्यात कर्मचाऱ्यांचा बचाव होणार असून नागरीकांनाही दुपारच्या वेळी सुरळीत विज पुरवठ्यामुळे दिलासा मिळणार आहे. मराठवाड्यात विज कंपनीकडून मागील काही दिवसांपासून मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. पावसाळ्यात वारंवार विज पुरवठा खंडीत होऊ नये या उद्देशाने हि कामे केली जात असून यामध्ये प्रामुख्याने विज वाहिन्यांवर येणाऱ्या झाडाच्या फांद्या कट केल्या जात आहेत. तसेच आवश्यक तेथे विज वाहिन्या बदलल्या जात असून तुटलेले पीन, डिस्क इन्सुलेटर्स बदलणे, रोहित्र बदलणे, फिडर पिलर, रिंगमेन युनीटची आर्थिंक तपासणे, आॅईल फिल्टरे्शन, ऑईल टॉपिंगअप, रोहित्र पेटीची दुरुस्ती, तारांमधील झोल काढण्याचे काम केले जात आहे. सध्याच्या स्थितीत सकाळी १० ते दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत हि कामे केली जात आहेत. मात्र सदर कामे करतांना विज पुरवठा खंडीत करावा लागत आहे. दुपारच्या वेळी विज पुरवठा नसल्याने नागरीकांकडून तक्रारी केल्या जात आहेत. याशिवाय उन्हाचा तडाखा वाढणार असून त्यामुळे विजेची मागणीही वाढणार आहे. मात्र उन्हाच्या तडाख्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बचाव करणेही तेवढेच आवश्यक आहे. त्यानुसार विज कंपनीने सदरील मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे सकाळी सात ते आकरा यावेळेतच करण्याच्या सूुचना दिल्या आहेत. त्यानतंर दुपारी ग्राहकांसाठी विज पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचनाही विज कंपनीच्या वरिष्ठ कार्यालयाने दिल्या आहेत. त्यामुळे आता दुपारच्या सुमारास विज पुरवठा सुरळीत राहणार असल्याने ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.
