गोमातेला 'राष्ट्रमाता' दर्जा देण्याची मागणी:हिंगोलीत गौ सन्मान दिवसानिमित्त भव्य पदयात्रा

0
whatsapp-image-2026-04-27-at-60231-pm_1777293302.jpeg




गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा आणि त्यांच्या संरक्षण व सन्मानासाठी जनजागृती व्हावी, या उदात्त उद्देशाने आज हिंगोली शहरात ‘गौ सन्मान दिवस’ निमित्त भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेच्या माध्यमातून हजारो नागरिकांनी एकत्र येत गोवंश रक्षणाचा एल्गार पुकारला. या पदयात्रेची सुरुवात शहरातील ऐतिहासिक बद्रीनारायण मंदिर येथून करण्यात आली. भगवे ध्वज आणि गोमातेच्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. ही यात्रा जवाहर रोड, गांधी चौक, इंदिरा चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. ठिकठिकाणी नागरिकांनी या पदयात्रेचे स्वागत केले. पदयात्रेत खुशालचंद महाराज, भगवानदास महाराज,सुभाष पुरी, गोविंदजी स्वामी, महाराज यांच्यासह भाजपा जिल्हाध्यक्ष गजाननराव घुगे,न.प गटनेते श्रीराम बांगर, शशिकांत वडकुते, प्रकाश सोनी, दिपक निमोदिया,जगजीतराज खुराणा, मनिष आखरे,ॲड.मनिष साकळे, राजेंद्र हलवाई,कैलाश श्रिनाथ, सुभाष अपूर्वा भाजपा प्रवक्ता विलास गोरे, कपील खंडेलवाल, रजनीश पुरोहीत, बाबा घुगे, संजय खंडेलवाल,पवन उपाध्ये,प्रशांत गुप्ता, ताराचंद धुत, नामदेव मस्के, कृष्णा अग्रवाल सहभागी झाले होते. पदयात्रेचा समारोप उपविभागीय अधिकारी कार्यालयावर झाला. यावेळी गोमातेचा सन्मान आणि संरक्षणाबाबतच्या विविध मागण्यांचे तसेच हजारो नागरिकांच्या स्वाक्षऱ्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी समाधान घुटकुडे यांना सादर करण्यात आले. गोमातेला ‘राष्ट्रमाता’ म्हणून घोषित करावे, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या कार्यक्रमात हिंगोली शहरातील अबालवृद्ध, सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोसेवा आणि गोवंश टिकवणे ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले या जनजागृती मोहिमेला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed