रसिकांचे प्रेम, हाच सर्वोत्तम पुरस्कार-डॉ. प्रकाश आमटे:गझलनवाज भीमराव पांचाळे यांचा अमृत महोत्सत; गझलांनी रसिक झाले मंत्रमुग्ध‎

0
240_177721581269ee29442ae02_26bhimraopanc.jpg




प्रतिनिधी | अकोला प्रमिलाताई ओक सभागृहात लोकरंगतर्फे मराठी गझल विश्वातील गायक- गझल नवाज भीमराव पांचाळे भीमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. मराठी बोलली, वाचली जाणाऱ्या असंख्य देशात गझल नवाज भीमराव पांचाळे यांनी मराठी गझल पोहोचवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या सुरेल गायनाने वय केवळ एक आकडा असतो, हे त्यांनी सिद्ध केले आहे. कोणत्याही कलावंतासाठी रसिकांचे प्रेम हाच सर्वोत्तम पुरस्कार असतो असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांनी याप्रसंगी केले. अध्यक्षस्थानी लोकरंग तथा आयोजन समितीचे अध्यक्ष अनिल गावंडे होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मंदाकिनी आमटे, प्रसिद्ध अभिनेते भारत गणेशपुरे, नीलिमा भोसले, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, सिंदखेडराजा येथील उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, प्रशांत देशमुख, गीता पांचाळे आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन पांचाळे यांचा सत्कार करण्यात आला. प्रशांत देशमुख आणि राजश्री देशमुख यांनी यावेळी पांचाळे दांपत्याला आहेर अर्पण केला. कार्यक्रमाचे निवेदन कवी किशोर बळी यांनी केले. मानपत्राचे वाचन अरुंधती सिरसाट यांनी केले. सुप्रसिद्ध चित्रकार सतीश पिंपळे यांनी हे मानपत्र तयार केले आहे. सत्कार सोहळा आणि गझल मैफल हा जवळजवळ चार तासांचा अविस्मरणीय सोहळा रसिक प्रेक्षकांनी अनुभवला. गेल्या वर्षभरापासून वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या लोकरंग परिवाराचा हा आणखी एक सोहळा हाऊसफुल्ल झाला. सूत्रसंचालन राजश्री देशमुख यांनी केले तर आभार लोकरंगचे सचिव ॲड. सुधाकर खुमकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अशोक ढेरे, डॉ. राजेंद्र सोनोने, श्रीकांत पागृत, डॉ. संदीप चव्हाण, पुरुषोत्तम आवारे पाटील, ॲड. वल्लभ नारे, अविनाश परळीकर, दिलीप आवटे, रवींद्र मोहोड, राजेश कराळे, नगरसेवक पराग गवई, मनोज जयस्वाल, प्रकाश बागडे, नितीन भटकर, चंद्रकांत झटाले, भगवान उमाळे, यादवराव वाघमारे, गजानन काळे, राहुल तायडे, गोपाल मापारी, प्रदीप म्हैसने आदींचे सहकार्य लाभले.गझल मैफिलीचे निवेदन किशोर बळी यांनी केले. सुधाकर अंबुसकर (संवादिनी), प्रशांत अग्निहोत्री (बासरी), डॉ. देवेंद्र यादव (तबला), शिरीष भालेराव (व्हायोलीन),डॉ. सुमंत अंबुसकर (गिटार), शिवम भौरदकर (गिटार) या सर्वांनीच कार्यक्रमात वेगळीच रंगत आणली. लोकरंग परिवारातर्फे या सर्वांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed