बागेश्वर बाबाविरोधात काँग्रेसचे 'जोडेमारो' आंदोलन:छत्रपती शिवाजी महाराजांवरील वादग्रस्त विधानावरून निषेध

0
b001dd1a-661a-4aff-b2d0-a28f85936f0d_1777138533091.jpg




छत्रपती संभाजीनगर येथे काँग्रेसने बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्याविरोधात तीव्र ‘जोडेमारो’ आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी क्रांती चौकात जोरदार निदर्शने केली आणि धीरेंद्र शास्त्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर आणि शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. यावेळी बोलताना शहराध्यक्ष शेख युसूफ यांनी भाजप आणि आरएसएसवर टीका केली. ते म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज समजण्याची बागेश्वरसारख्या भोंदूची लायकी नाही. याचे बोलविते धनी वेगळे आहेत आणि त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे.” त्यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली. आंदोलनकर्त्यांनी ‘भोंदू बाबा बागेश्वर हाय हाय’, ‘भाजप सरकार होश में आओ’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. धीरेंद्र शास्त्री यांच्या प्रतिमेला जोडे मारून कार्यकर्त्यांनी आपला तीव्र संताप व्यक्त केला. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर, शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्यासह जगन्नाथ काळे, इब्राहिम पठाण, भाऊसाहेब जगताप, अनिस पटेल, विशाल बन्सवाल, मोईन इनामदार, सूर्यकांत गरड, विश्वास औताडे, राहुल सावंत, असदउल्ला शकील, डॉ. सिकंदर शेख, योगेश थोरात, दिलीप भोसले, संजय धर्मरक्षक, रेखा वाहतुळे आणि गौरव जैस्वाल यांसारखे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed