भाजप कार्यकर्त्यांना मिळणार संघटनात्मक ताकद:प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न

0
11a02792-5a88-4fac-8234-5b87e72a74fc_1777139219831.jpg




छत्रपती संभाजीनगर येथे शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र विभागाची जिल्हा प्रशिक्षण वर्ग नियोजन कार्यशाळा पार पडली. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली. यावेळी कार्यकर्त्यांना संघटनात्मक ताकद दिली जाईल आणि पक्षाची बांधणी मजबूत केली जाईल, असे चव्हाण यांनी सांगितले. भाजपच्या विभागीय कार्यालयात झालेल्या या बैठकीला ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, सुनील राणे, माजी मंत्री डॉ. भागवत कराड, भारती पवार, आमदार संजय केणेकर, अनुराधा चव्हाण, नारायण कुचे, प्रितम मुंडे, प्रविण घुगे, इद्रिस मुलतानी, संजय कौडगे, अर्चना चाकुरकर, शहराध्यक्ष किशोर शितोळे, मनोज पांगारकर, चैतन्य देशमुख, महापौर समीर राजूरकर, स्थायी समिती सभापती अनिल मकरिये यांच्यासह दोन्ही विभागातील प्रमुख जिल्हा पदाधिकारी उपस्थित होते. पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानांतर्गत राज्यात १ हजार २०० हून अधिक मंडळाचे निवासी अभ्यासवर्ग यापूर्वीच पूर्ण झाले आहेत. आता मे महिन्यात जिल्ह्यांचे अभ्यास वर्ग पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या कार्यशाळेत त्यासाठी लागणारे वक्ते, त्यांचे प्रशिक्षण, अभ्यास वर्गासाठीचे ठिकाण आणि अभ्यास वर्ग कशा पद्धतीने घ्यावेत, यासंबंधीची सविस्तर माहिती देण्यात आली, असे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना नमूद केले. दरम्यान, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीबाबतच्या वृत्तावर विचारले असता, प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी अधिक भाष्य करणे टाळले. “मी नाशिकमध्ये असताना देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात जे उत्तर द्यायला हवे होते, ते दिले आहे,” असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed