इंडूरन्स कंपनीच्या CSR मधून वाघोळा येथे ग्रामविकास प्रकल्प सुरू:नदी खोलीकरण, रुंदीकरण आणि तलावातील गाळ काढण्याच्या कामांचा शुभारंभ

0
825c504b-b0a9-4728-b3db-cc7c689116ec_1777200575325.jpg




छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री तालुक्यातील वाघोळा गावात इंडूरन्स कंपनीच्या सीएसआर (CSR) उपक्रमांतर्गत ग्रामविकास प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला आहे. सेवक ट्रस्टच्या सहकार्याने राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पातून गावाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात नदीचे खोलीकरण व रुंदीकरण तसेच तलावातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आला. काही दिवसांपूर्वी आयोजित ग्रामसभेत गावाच्या विकास आराखड्यावर चर्चा करून या कामांचे नियोजन करण्यात आले होते. या विकासकामांचा शुभारंभ अनिवासी वाघोळाकर आणि ज्येष्ठ सेवानिवृत्त कर्मचारी रावसाहेब येडूबा पाटील गायकवाड, शिवाजी आत्माराम पाटील गायकवाड आणि रामदास महाळणकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बोलताना फुलंब्री कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक विकास पाटील गायकवाड यांनी सांगितले की, गेल्या १७ वर्षांपासून वाघोळा ग्रामविकासासाठी प्रयत्न करत असताना इंडूरन्स कंपनीच्या सीएसआर आणि सेवक ट्रस्टच्या सहकार्याने सुरू झालेला हा प्रकल्प एक महत्त्वाचा टप्पा आहे. यामुळे गावाच्या विकासाला नवी दिशा मिळेल आणि भविष्यात अनेक मूलभूत सुविधा गावकऱ्यांपर्यंत पोहोचतील. या प्रसंगी इंडूरन्स कंपनीचे प्रतिनिधी उदय दुधगावकर, सुनील शिंदे यांच्यासह बाबुराव गायकवाड, संतोष गायकवाड, रामू गायकवाड, कचरू गायकवाड, श्रीमंत गायकवाड, संजय कावळे, भगवान गायकवाड, जनार्धन गायकवाड, सचिन गायकवाड, रोहिदास थोरात, श्रीराम गायकवाड, पुंजाराम गायकवाड, अनिल गायकवाड, सोपान गायकवाड आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. इंडूरन्स कंपनीने सीएसआर माध्यमातून उचललेले हे पाऊल ग्रामीण विकासासाठी आदर्श ठरत आहे. अशा उपक्रमांमुळे गावांचा शाश्वत विकास शक्य होतो. विकास गायकवाड यांनी सीएसआर अंतर्गत काम करणाऱ्या विविध कंपन्या, संस्था आणि समाजहितैषी व्यक्तींना वाघोळा तसेच पोफळा येथे ग्रामविकासाची कामे हाती घेण्यासाठी आवाहन केले. ग्रामीण भागाच्या प्रगतीसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन हातभार लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed