Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा लेटेस्ट दर
Petrol Diesel Price | मे २०२२ पासून केंद्र आणि राज्य सरकारांनी मूल्यवर्धित करात (व्हॅट) केलेल्या कपातीमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. मात्र, सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर होर्मुझच्या सामुद्रधुनीतील तणावामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात मोठे अडथळे निर्माण झाले आहेत. या जागतिक घडामोडींमुळे आगामी मे महिन्यात इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
प्रमुख शहरांतील आजचे इंधन दर
आज राजधानी दिल्ली (Delhi) येथे पेट्रोल ₹९४.७७ प्रति लिटर दराने विकले जात असून, गेल्या काही दिवसांपासून हा दर स्थिर आहे. डिझेलची किंमतही ₹८७.६२ प्रति लिटरवर कायम आहे. मुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोल ₹१०४.२१ आणि डिझेल ₹९२.१५ प्रति लिटर आहे, तर कोलकाता (Kolkata) येथे पेट्रोल ₹१०३.९४ आणि डिझेल ₹९०.७६ दराने उपलब्ध आहे.
पुणे (Pune) मध्ये पेट्रोल ₹१०४.०४ व डिझेल ₹९०.५७, चंदीगड (Chandigarh) येथे पेट्रोल ₹९४.३० व डिझेल ₹८२.४५, इंदूर (Indore) मध्ये पेट्रोल ₹१०६.४८ व डिझेल ₹९१.८८, तर पाटणा (Patna) येथे पेट्रोल ₹१०५.५८ आणि डिझेल ₹९३.८० आहे. सुरत (Surat) मध्ये पेट्रोल ₹९५.०० व डिझेल ₹८९, तसेच नाशिक (Nashik) मध्ये पेट्रोल सुमारे ₹९५.५० आणि डिझेल ₹८९.५० दराने विकले जात आहे.
चेन्नई (Chennai) मध्ये पेट्रोल ₹१००.७५ आणि डिझेल ₹९२.३४, अहमदाबाद (Ahmedabad) मध्ये पेट्रोल ₹९४.४९ व डिझेल ₹९०.१७, तर बंगळुरू (Bengaluru) येथे पेट्रोल ₹१०२.९२ आणि डिझेल ₹८९.०२ आहे. हैदराबाद (Hyderabad) मध्ये पेट्रोल ₹१०७.४६ आणि डिझेल ₹९५.७०, जयपूर (Jaipur) येथे पेट्रोल ₹१०४.७२ व डिझेल ₹९०.२१, लखनौ (Lucknow) मध्ये पेट्रोल ₹९४.६९ व डिझेल ₹८७.८० आहे.
राज्य पातळीवर पाहता, आंध्र प्रदेशमध्ये पेट्रोल ₹१०९.४२, आसाममध्ये ₹९८.९३, बिहारमध्ये ₹१०६.२२, गोव्यात ₹९६.६७, गुजरातमध्ये ₹९५.०६, हरियाणात ₹९५.७५, कर्नाटकमध्ये ₹१०३.३०, केरळमध्ये ₹१०६.३१, महाराष्ट्रात ₹१०४.७९ आणि राजस्थानमध्ये ₹१०५.५१ दर नोंदवले गेले आहेत. ग्राहकांना एसएमएसद्वारे दर जाणून घेण्यासाठी इंडियन ऑइल (Indian Oil) ग्राहकांनी RSP कोड ९२२४९९२२४९ वर, बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी ९२२३११२२२२ वर आणि एचपीसीएल (HPCL) ग्राहकांनी ९२२२२०११२२ वर पाठवावा.
News Title: Petrol Diesel Price Current Fuel rate in India amid Middle East Crisis
