नांदेड जिल्हा पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सदा आकुलवार यांचे निधन
नांदेड (प्रतिनिधी) – नांदेड जिल्हा पोलीस दलात कार्यरत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सदा आकुलवार यांचे आजारपणावर उपचार सुरू असताना काल रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने पोलीस दलासह शहरात शोककळा पसरली आहे.
दत्तात्रय अकोलकर (वय 53 ) हे नांदेड येथील निळेश्वर कॉलनी परिसरात वास्तव्यास होते. काही दिवसांपासून ते आजारी असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. मात्र प्रकृती खालावल्याने काल रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली.
त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, जावई तसेच भाऊ-बहिणी असा परिवार आहे. कर्तव्यदक्ष व मनमिळाऊ अधिकारी म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या निधनाबद्दल सहकारी अधिकारी, कर्मचारी व नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत असून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली जात आहे.वास्तव न्यूज लाईव्ह परिवार सुद्धा आकुलवार कुटूंबियांची दुःखात सहभागी आहे.
Post Views: 319
