चोरीच्या 14 दुचाकींसह दोन चोरट्यांना पकडले:जप्त दुचाकी गाडगेनगर, राजापेठ हद्दीतील सर्वाधिक‎

0
240_177712541869ecc82aaea04_img20260425wa.jpg




शहरातील वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेने एका विशेष मोहिमेत यश संपादन केले आहे. या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत दुचाकी चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून ७ लाखांच्या एकूण १४ चोरीच्या दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई पोलिसांनी शनिवारी (दि. २५) केली आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या १४ दुचाकींमध्ये राजापेठ व गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील सर्वाधिक दुचाकी आहेत. गौरव विठ्ठल ढोणे (३०, रा. म्हैसपूर, ता. भातकुली) आणि सुरज उर्फ भोला मुन्नालाल सकवार (३०, रा. नांदेड बु., ता. दर्यापूर) या दोघांना अटक केली असून त्यांचा साथीदार रोशन थोरात (रा. खोलापूर) हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक गस्तीवर असताना त्यांना एका गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली. गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका चोरीच्या गुन्ह्यातील दुचाकी विक्री करण्यासाठी दोन तरुण शहरातील आयएमए हॉल समोरील रस्त्यावर येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून कॅम्प भागातून इर्विनकडे येणाऱ्या एका दुचाकीला थांबवले. त्यावेळी गौरव व सुरज यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्या दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, परंतु पोलिसांनी विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सुमारे १५ दिवसांपूर्वी डफरीन हॉस्पिटलच्या पार्किंगमधून एक दुचाकी चोरल्याचे मान्य केले. पाय ठेऊन हॅन्ड लॉक तोडण्यात पटाईत पोलिसांनी अटक केलेले दोघे व पसार असलेला तिसरा या तिघांनी शहरात अनेक दुचाकी चोरी केल्या. दुचाकी चोरण्यासाठी गौरव दुचाकीवर पाय ठेवून हॅन्डल लॉक तोडण्यात पटाईत आहे. तो इतका सराईत आहे कि, अवघ्या दोन ते तीन मिनीटात पायाच्या मदतीने हॅन्डल लॉक तोडतो आणि दुचाकी घेऊन पोबारा ठोकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed