‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचा आजपासून शंखनाद:30 नद्यांच्या कलशातून घुमणार जलसंवर्धनाचा जागर, अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंतीनिमित्त उपक्रम
![]()
राज्यातील जलव्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी आणि जलसंवर्धनाचा संदेश घराघरात पोहोचवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षाचे औचित्य साधून ‘गोदा ते नर्मदा जलयात्रा २०२६’ चे भव्य आयोजन करण्यात आल
.
विचार, वारसा आणि विकास या त्रिसूत्रीच्या आधारे जलव्यवस्थापनाचे काम अधिक प्रभावीपणे करण्याचा संकल्प असून, अहिल्यादेवींनी दाखवलेला जलसंवर्धनाचा मार्ग आजच्या काळातही तितकाच प्रेरक आहे, असे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले. या यात्रेत सुमारे ५०० जलयात्री, वारकरी, युवक आणि लोकप्रतिनिधी सहभागी होणार आहेत. यात्रेदरम्यान अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटाची चित्रफीत दाखवून त्यांच्या जलव्यवस्थापनाच्या कार्याची माहिती दिली जाणार आहे.
असा असेल यात्रेचा मार्ग
१. २५ एप्रिल : त्र्यंबकेश्वर आणि चौंडी येथून प्रारंभ. २. २६ एप्रिल: शिर्डी येथे दोन्ही यात्रांचा संगम; सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी. ३. २७ एप्रिल: कोपरगाव, वैजापूर, गंगापूर मार्गे छत्रपती संभाजीनगर व घृष्णेश्वर मुक्काम. ४. २८ एप्रिल: कन्नड, चाळीसगाव मार्गे धुळे येथे आगमन. ५. २९ एप्रिल: धुळे ते महेश्वर (मध्य प्रदेश) प्रवास आणि यात्रेचा भव्य समारोप होणार आहे.
जलकुंड शोधण्यासाठी सरकारकडून आराखडा
अहिल्याबाई होळकर यांनी जलकुंडाची निर्मिती केली. जलस्रोत निर्माण होण्यास त्याचा मोठा फायदा झाला. काळाच्या ओघात अनेक जलकुंड भूमिगत झाले तर काहींची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून हे जलकुंड शोधण्यासाठी आराखडा तयार केला जाईल, असे विखे पाटील यांनी सांगितले.
