[ads1]
या कार्यक्रमास पोलीस उप महानिरीक्षक, नांदेड परिक्षेत्र शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी निरोगी, आनंदी व सुखी जीवनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या. सेवाकाळात कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पार पाडणे, गुन्हे प्रतिबंध व तपास, वाहतूक नियमन तसेच विविध पोलीस कर्तव्ये पार पाडण्यात या अधिकारी-अंमलदारांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले. त्यांच्या प्रदीर्घ सेवेमुळे पोलीस दलाच्या कार्यक्षमतेत मोलाची भर पडल्याबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी-अंमलदारांमध्ये पोलीस निरीक्षक जगन गणपती पवार (वाहतूक शाखा, इतवारा), पोलीस उपनिरीक्षक सुधाकर संग्रामसिंग राठोड (पोलीस नियंत्रण कक्ष, नांदेड), ग्रेड पोलीस उपनिरीक्षक कैलास राजाराम पवार (पोलीस ठाणे अर्धापूर), ग्रेड पोलीस उपनिरीक्षक राम नामदेवराव कराड (पोलीस ठाणे भोकर), ग्रेड पोलीस उपनिरीक्षक बंडू किशनराव गवई (पोलीस ठाणे मुदखेड), ग्रेड पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग सुदाम जानापुरे (पोलीस मुख्यालय), सहायक पोलीस उपनिरीक्षक माधव दिगंबर कदम (पोलीस ठाणे लोहा), सहायक पोलीस उपनिरीक्षक यशवंत माधवराव देशमुख (पोलीस मुख्यालय), सहायक पोलीस उपनिरीक्षक बालाजी महादजी जाधव (पोलीस ठाणे उमरी), पोलीस हवालदार शिवाजी जळबा राजगीरे (पोलीस ठाणे भाग्यनगर), पोलीस हवालदार संजय प्रल्हाद लगडे (पोलीस मुख्यालय), पोलीस शिपाई गुणवंत शंकरराव जाधव (पोलीस मुख्यालय) आणि पोलीस शिपाई तानाजी बामनाजी भोसले (पोलीस ठाणे उमरी) यांचा समावेश आहे.
समारंभादरम्यान सेवानिवृत्त अधिकारी व अंमलदारांनी सेवाकाळातील अनुभव व्यक्त केले. पोलीस दलातील सेवा ही केवळ नोकरी नसून समाजाच्या सुरक्षिततेसाठी पार पाडलेले कर्तव्य असल्याचे त्यांनी नमूद केले. सेवाकाळात मिळालेल्या सहकार्याबद्दल वरिष्ठ अधिकारी, सहकारी अधिकारी व अंमलदारांचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे नियोजन पोलीस कल्याण विभागाचे पोलीस निरीक्षक जगदीश मंडलवार, हनमंत पोतदार, मारोती कांबळे व महिला अंमलदार सविता भीमलवाड यांनी केले. सूत्रसंचालन सहायक पोलीस निरीक्षक रियाज शेख यांनी केले. दीर्घ व उल्लेखनीय सेवेनंतर निवृत्त होणाऱ्या सर्व अधिकारी-अंमलदारांचा भावपूर्ण निरोप समारंभाने समारोप झाला.

[ads2]
What do you feel about this post?
Like
Love
Happy
Haha
Sad