१० मोठ्या बोटी जिलेटिनने उडवल्या; मुदखेड व उस्माननगर हद्दीत अवैध रेती उपशावर मोठी कारवाई नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपशाला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी धडक मोहीम राबवली. मुदखेड आणि उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून पोलिसांनी तब्बल ५ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रेती उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या १० मोठ्या लोखंडी बोटी जिलेटिनच्या साहाय्याने जागीच ब्लास्ट करून नष्ट करण्यात आल्या. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चिंचोली, महाटी, माळकौठा, सीतानदी नाला, कामळज आणि चिलपिंपरी येथील गोदावरी नदीपात्रात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अवैध रेती उपसा, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि शासनाचा बुडणारा महसूल रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वजणे (नांदेड शहर), पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर (बिलोली) आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मुदखेड येथील प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, शहरातील गुन्हे शोध पथक, क्यूआरटी आणि आरसीपी पथकांनी संयुक्तपणे नदीपात्रातील रेती उपसा केंद्रांवर छापे टाकले. ५ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त या कारवाईत पोलिसांनी १० मोठ्या लोखंडी बोटी (प्रत्येकी ३० लाख रुपये) अशा एकूण ३ कोटी रुपयांच्या बोटी जिलेटिनच्या साहाय्याने जागीच नष्ट केल्या. याशिवाय चार छोट्या बोटींची किंमत ६० लाख रुपये, रेती उपसा करणारे दोन इंजिन ५ लाख रुपये, चार हायवा वाहने १ कोटी ६० लाख रुपये आणि ५० ब्रास रेतीची किंमत २ लाख ५० हजार रुपये असा एकूण ५ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मुदखेड आणि उस्माननगर पोलीस ठाण्यात वाळू माफिया, चालक आणि वाहनमालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार कठोर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव आणि अपर पोलीस अधीक्षिका अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक गणेश कराड (मुदखेड), पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, खंडू दर्शने, सत्तूद, शिंदे तसेच मुदखेड व उस्माननगर येथील पोलीस अंमलदार आणि क्यूआरटी, आरसीपी पथकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर रेती उपसा करून पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या रेती माफियांना कोणतीही गय केली जाणार नाही. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरूच राहतील, असा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 727 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation बेकायदेशीर गोवंश वाहतूक करणारी २ वाहने जप्त, ८ जनावरांची सुटका; ४ आरोपींवर गुन्हा दाखल – VastavNEWSLive.com
१० मोठ्या बोटी जिलेटिनने उडवल्या; मुदखेड व उस्माननगर हद्दीत अवैध रेती उपशावर मोठी कारवाई नांदेड (प्रतिनिधी) – गोदावरी नदीपात्रातून सुरू असलेल्या अवैध रेती उपशाला आळा घालण्यासाठी नांदेड पोलिसांनी मोठी धडक मोहीम राबवली. मुदखेड आणि उस्माननगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून पोलिसांनी तब्बल ५ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये रेती उपशासाठी वापरण्यात येणाऱ्या १० मोठ्या लोखंडी बोटी जिलेटिनच्या साहाय्याने जागीच ब्लास्ट करून नष्ट करण्यात आल्या. या कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. चिंचोली, महाटी, माळकौठा, सीतानदी नाला, कामळज आणि चिलपिंपरी येथील गोदावरी नदीपात्रात ही विशेष मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले आणि पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार अवैध रेती उपसा, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास आणि शासनाचा बुडणारा महसूल रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. २४ नोव्हेंबर रोजी सकाळी पोलीस उपअधीक्षक रामेश्वर वजणे (नांदेड शहर), पोलीस उपअधीक्षक शाम पानेगावकर (बिलोली) आणि परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक वैभव पडवळ यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. मुदखेड येथील प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी, शहरातील गुन्हे शोध पथक, क्यूआरटी आणि आरसीपी पथकांनी संयुक्तपणे नदीपात्रातील रेती उपसा केंद्रांवर छापे टाकले. ५ कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त या कारवाईत पोलिसांनी १० मोठ्या लोखंडी बोटी (प्रत्येकी ३० लाख रुपये) अशा एकूण ३ कोटी रुपयांच्या बोटी जिलेटिनच्या साहाय्याने जागीच नष्ट केल्या. याशिवाय चार छोट्या बोटींची किंमत ६० लाख रुपये, रेती उपसा करणारे दोन इंजिन ५ लाख रुपये, चार हायवा वाहने १ कोटी ६० लाख रुपये आणि ५० ब्रास रेतीची किंमत २ लाख ५० हजार रुपये असा एकूण ५ कोटी २७ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मुदखेड आणि उस्माननगर पोलीस ठाण्यात वाळू माफिया, चालक आणि वाहनमालकांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार कठोर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने, अपर पोलीस अधीक्षक संदीप जाधव आणि अपर पोलीस अधीक्षिका अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस निरीक्षक गणेश कराड (मुदखेड), पोलीस उपनिरीक्षक गजानन गाडेकर, खंडू दर्शने, सत्तूद, शिंदे तसेच मुदखेड व उस्माननगर येथील पोलीस अंमलदार आणि क्यूआरटी, आरसीपी पथकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. गोदावरी नदीपात्रातून बेकायदेशीर रेती उपसा करून पर्यावरणाचा समतोल बिघडवणाऱ्या आणि शासनाचा महसूल बुडवणाऱ्या रेती माफियांना कोणतीही गय केली जाणार नाही. अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी अशा विशेष मोहिमा यापुढेही सुरूच राहतील, असा इशारा नांदेड पोलिसांनी दिला आहे.