नांदेड (प्रतिनिधी) – आर्य समाज नांदेडच्या वतीने श्रावणी वेदप्रचार मासानिमित्त तीन दिवसीय श्रावणी वेदप्रचार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव ९ ते ११ सप्टेंबर २०२६ दरम्यान जुना मोंढा परिसरातील आर्य समाज मंदिरात होणार आहे.
महोत्सवात यज्ञ, वैदिक प्रवचने, ज्ञानयज्ञ, महिला संमेलन तसेच शंका-समाधान अशा विविध धार्मिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवासाठी प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील वैदिक विद्वान व व्याख्याते डॉ. आशर्फीलालजी शास्त्री हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच एटा (उत्तर प्रदेश) येथील भजनोपदेशक पं. शिवपालजी आर्य हे भजन व उपदेशाच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
महोत्सवाच्या कालावधीत दररोज सकाळी ८ ते १० आणि सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ज्ञानयज्ञ, व्याख्याने व प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. या वैदिक ज्ञान व प्रबोधनाच्या पर्वात नागरिकांनी सहकुटुंब सहभागी होऊन महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आर्य समाज नांदेडच्या अध्यक्षा श्रीमती जी. व्ही. मारमपल्ले, मंत्री ॲड. ओम ऋतुध्वज कदम, कोषाध्यक्ष यादव भांगे, उपप्रधान अभय कुलकर्णी, उपमंत्री धोंडीबा सुरावार, व्यवस्थापक गजानन डोके यांच्यासह सर्व मार्गदर्शक व सदस्यांनी केले आहे.