मुंढवा जमीन घोटाळ्यात ट्विस्ट!:पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे शीतल तेजवानीला जामीन; पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
![]()
पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीला मोठा दिलासा मिळाला आहे. उच्च न्यायालयाने तिची अटक आणि रिमांड प्रक्रियेत गंभीर त्रुटी आढळल्याचे नमूद करत जामीन मंजूर केला आहे. विशेष म्हणजे, बावधन पोलिसांच्या कामकाजातील हलगर्जीपणाचा फायदा तेजवानीला झाल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. या निर्णयामुळे पोलिसांच्या तपास पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आम्ही हे वृत्त अपडेट करत आहोत…
