Heatwave Safety Tips | राज्यावर उष्माघाताचे सावट; ‘या’ गोष्टींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका!
Heatwave Safety Tips | राज्यातील वाढत्या तापमानामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. अनेक भागांत तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असून उष्णतेची लाट जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिकेच्या (Pune Municipal Corporation) आरोग्य विभागाने नागरिकांना सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. (heat stroke prevention)
पुण्यासह राज्यभरात उष्णतेचा प्रभाव वाढत असल्याने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी नियमित पाणी पिणे गरजेचे आहे, जरी तहान लागली नसली तरीही थोड्या-थोड्या वेळाने पाणी घेत राहावे. उन्हात बाहेर पडताना डोके, मान आणि चेहरा झाकण्यासाठी ओल्या कापडाचा वापर करावा, ज्यामुळे थेट सूर्यप्रकाशाचा परिणाम कमी होतो. (Heatwave Safety Tips)
तसेच आहारात पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आणि भाज्या समाविष्ट करणे फायदेशीर ठरते. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस आणि काकडी यांचा आहारात समावेश केल्याने शरीरात पाण्याची कमतरता राहत नाही. घर थंड ठेवण्यासाठी खिडक्यांना पडदे लावणे, रात्री खिडक्या उघड्या ठेवणे आणि पंखे किंवा ओल्या कापडाचा वापर करणे उपयुक्त ठरते.
Heatwave Safety Tips | उष्माघात टाळण्यासाठी काय टाळावे?:
उष्णतेच्या काळात काही गोष्टी टाळणे तितकेच महत्त्वाचे आहे. दारू, चहा, कॉफी किंवा साखरयुक्त थंड पेयांचे सेवन टाळावे, कारण यामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होऊ शकते. दुपारी 12 ते 3 या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे, तसेच जास्त शारीरिक कष्टाची कामेही करू नयेत. (summer precautions)
याशिवाय, घट्ट किंवा गडद रंगाचे कपडे घालणे टाळावे आणि नेहमी हलके, सैल सुती कपडे वापरावेत. बाहेर जाताना चप्पल किंवा शूज घालणे आवश्यक आहे. उष्माघाताची लक्षणे जसे की डोकेदुखी, अशक्तपणा किंवा सतत घाम येणे जाणवू लागल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने (Metropolitan servelance unit) स्पष्ट केले आहे.
