Hardik Pandya | मुंबई इंडियन्सच्या पराभवानंतर हार्दिक पांड्या हतबलं! बोलून दाखवली मनातील खंत
Hardik Pandya | आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक ठरत असून संघाला सलग पराभवांचा सामना करावा लागत आहे. पंजाब किंग्सविरुद्ध (Punjab Kings) झालेल्या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याने आपल्या भावना व्यक्त करत संघाच्या कामगिरीबद्दल स्पष्ट नाराजी दर्शवली.
मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) या हंगामातील प्रवास सुरुवातीला चांगला झाला होता, कारण त्यांनी कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) विरुद्ध पहिला सामना जिंकत अनेक वर्षांची परंपरा मोडली होती. मात्र त्यानंतर संघाला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru), राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर पंजाब किंग्सविरुद्धही पराभव झाल्याने मुंबईची परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. (Mumbai Indians loss)
या सामन्यात मुंबईने वानखेडे स्टेडियम (Wankhede Stadium) येथे प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 विकेट गमावत 195 धावा केल्या. मात्र पंजाब किंग्सने हे आव्हान अवघ्या 16.3 षटकांत 3 विकेट गमावत सहज पार केलं. घरच्या मैदानावर झालेल्या या पराभवामुळे संघावर टीका होत असून चाहत्यांमध्ये नाराजी वाढली आहे. संघात हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav), जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आणि तिलक वर्मा (Tilak Varma) यांसारखे अनुभवी खेळाडू असूनही अपेक्षित कामगिरी दिसत नाही.
Hardik Pandya | हार्दिक पांड्याची प्रतिक्रिया :
सलग पराभवानंतर हार्दिक पंड्याने स्पष्ट शब्दांत आपली निराशा व्यक्त केली. त्याने सांगितले की, “प्रामाणिकपणे बोलायचं तर आता माझ्याकडे फार काही सांगण्यासारखं उरलेलं नाही. आम्हाला एकत्र बसून विचार करावा लागेल की संघ आणि खेळाडू म्हणून आपण नेमकं कुठे चुका करत आहोत. आमच्या योजनांमध्ये आणि अंमलबजावणीत सुधारणा करणं आवश्यक आहे.” (Hardik Pandya reaction)
त्याने पुढे पंजाब किंग्सच्या कामगिरीचं कौतुक करत सांगितलं की, प्रतिस्पर्धी संघाने चेंडूवर चांगला ताबा ठेवला आणि क्षेत्ररक्षणही प्रभावी केलं. तसेच आता “आम्हाला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील आणि पुढील सामन्यांसाठी स्वतःची जबाबदारी स्वीकारावी लागेल,” असंही पांड्याने नमूद केलं.
