जवळा दे. येथे संत शिरोमणी गोरोबाकाका यांची पुण्यतिथी साजरी
नांदेड- संतशिरोमणी गोरोबाकाका यांची ७०९ वी पुण्यतिथी लोहा तालुक्यातील जवळा दे. येथील हनुमान मंदिर परिसरात साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सोनखेडचे उपसरपंच सूनील मोरे, संतुकराव कानगुले, शिवसेना तालुका प्रमुख अशोक मोरे, धनंजय मोरे सोनखेडकर, प्रमुख मार्गदर्शक विश्वनाथन कोलमकर, मुखेड नगरसेवक प्रतिनिधी जयप्रकाश कानगुले, लोहा नगरसेवक सदाभाऊ तेलंग, जवळा दे येथील सरपंच इंदुताई पावडे, अजय पावडे, माजी सरपंच कमलताई शिखरे, माजी सैनिक दत्ताराव किवळेकर, माजी सरपंच ग्यानोबा टिमके, साहेबराव शिखरे, दिनाजी पावडे, सोपान बारसुळे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गंगाधर ढवळे आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संत गोरोबाकाका यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत गोरोबाकाका आरती घेऊन सर्वांच्या हस्ते गुलाल उधळण्यात आला. मान्यवरांच्या सत्कारानंतर सूनील मोरे आणि अशोक मोरे तसेच विश्वनाथ कोलमकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी धोंडीबा शिखरे, व्यंकटराव मोरे, राहुल गवळी, प्रल्हाद मोरे, अंकुश शिखरे पाटील, पंडित शिखरे, भानुदास शिखरे, नामदेव शिखरे, पांडुरंग शिखरे, शिवाजी शिखरे, ओम लाटकर शेवडीकर,संगम सर शेवडीकर, शिवाजी कवडे, बबन पांचाळ, आनंदा दगडगावकर, विठ्ठल गवळी, व्यंकटराव गोड, उमाकांत बेंबडे, यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष घटकार यांनी केले तर आभार प्रदर्शन गंगाधर ढवळे यांनी केले. उपस्थितांना आयोजकांकडून महाप्रसाद देण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रतन टिमके, तुकाराम टिमके, पंडित टिमके, शिवाजी टिमके, बालाजी तेलंग, बालाजी टिमके, नामदेव टिमके, किरण टिमके, किसन टिमके व आयोजक मारोती चक्रधर जवळेकर यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 11
