उजनीवर सर्वात मोठा 1हजार मेगावॅटचा ‘तरंगता सौर उर्जा’ प्रकल्प साकारणार:14,976 कोटींची गुंतवणूक, 500 बेरोजगारांना मिळेल काम
![]()
उजनी धरणावर जिंदाल समूहाकडून १४,९७६ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून तरंगता सौर ऊर्जा (फ्लोटिंग सोलर) प्रकल्प जाहीर झाल्याने स्थानिक रोजगार, पर्यटन आणि हरित ऊर्जेला मोठी चालना मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. हा प्रकल्प सध्या प्राथमिक मंजुरी व तांत्रिक सर
.
यापूर्वी महावितरणने २०१८ मध्ये पहिल्यांदा या प्रकल्पासाठी ‘एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्ट’ करीता जाहीर प्रसिध्दीकरण केले होते. नंतर जून २०१८ मध्ये महाराष्ट्र शासनाने या प्रकल्पाच्या सर्वेक्षणासाठी आणि पाणीसाठा, पर्यावरण तसेच मासेमारीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी महावितरणचे तत्कालीन संचालक सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष अभ्यास समिती स्थापन केली होती. २०१८-२०१९ च्या दरम्यान याच्या निविदा काढण्यात आल्या होत्या. मात्र, तांत्रिक आव्हाने, दरांचे गणित आणि पर्यावरणीय परवानग्या यामुळे प्रकल्पाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीची गती मंदावली होती.
.पाण्याचे बाष्पीभवन कमी, पाणी जास्त काळ टिकेल .सोलापूर, पुणे जिल्ह्यातील स्थानिक युवकांना रोजगार संधी. .सावली होणार असल्याने पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाईल. .बाष्पीभवन कमी झाल्याने पाणी साठा जास्त काळ टिकेल. .सौर प्रकल्पासाठी मोठ्या जमिनीची गरज भासणार नाही. .पाण्याच्या थंडाव्यामुळे सौर पॅनल लवकर गरम होत नाहीत. .वीज निर्मितीची क्षमता ५ ते १० टक्क्यांनी वाढते.
{एकूण क्षमता १००० मेगावॅट (१ गिगावॅट) {क्षेत्रफळ सुमारे ४ ते ५ हजार एकर क्षेत्र {वार्षिक वीज अंदाजे १.५ ते २ अब्ज युनिटस.
. मध्य प्रदेशात नर्मदा नदीवरील ओंकारेश्वर धरणावर ६०० मेगावॅट. . तेलंगणात रामागुंडम येथे एनटीपीसीचा १०० मेगावॅट. . केरळमधील कायाकुलमला ९२ मेगावॅट. . आंध्र मध्ये सिंहाद्री वीज केंद्र येथे २५ मेगावॅट.
