मुंबईत छत्रपती शिवरायांच्या जिरेटोप शिल्पावर जैन समाजाचा झेंडा, VIDEO:मनसे आक्रमक होताच संबंधित व्यक्तीकडून पोलिसांसमोर जाहीर माफी




मुंबईतील मालाड पूर्व परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिरेटोपाच्या शिल्पावर जैन समाजाचा पांढरा झेंडा लावण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली. या घटनेची माहिती मिळताच मनसेचे विभागाध्यक्ष महेश फरकासे यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेतली आणि झेंडा लावणाऱ्या व्यक्तीचा शोध घेत त्याच्याकडून जाहीर माफी मागून घेतली. मालाड पूर्वेतील चौकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या जिरेटोपाच्या शिल्पावर एका जैन व्यक्तीने चौथऱ्यावर चढून पांढरा झेंडा लावल्याचा दावा करण्यात आला. या घटनेची माहिती स्थानिक मनसैनिकांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, परिस्थिती तणावपूर्ण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनीही घटनास्थळी हजेरी लावली. माझ्याकडून चूक झाली, संबंधित व्यक्तीकडून जाहीर माफी मनसैनिकांनी संबंधित व्यक्तीला जाब विचारत, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या जिरेटोपावर झेंडा लावण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? असा सवाल केला. यानंतर संबंधित व्यक्तीने हात जोडून “माझ्याकडून चूक झाली,” असे म्हणत जाहीर माफी मागितली आणि स्वतः झेंडा काढून टाकला. झेंडा काढताना मनसैनिकांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय” आणि “जय भवानी, जय शिवाजी” अशा घोषणा दिल्या. भविष्यात अशा प्रकारची घटना पुन्हा घडू नये, असा इशाराही मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात या प्रकरणाची चर्चा सुरू आहे. मोठे मोठे गार केले गंमतमध्ये!:ठाकरे गटातील 6 खासदारांच्या फुटीनंतर मंत्री उदय सामंत यांचं व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस व्हायरल! शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याच्या घडामोडींमुळे राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे एक व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उदय सामंत यांनी आपल्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसमध्ये “मोठे मोठे गार केले गंमतमध्ये” असा मजकूर शेअर केला आहे. या स्टेटसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटोही दिसत आहे. त्यामुळे या स्टेटसचा संबंध थेट ठाकरे गटातील खासदारांच्या फुटीशी जोडला जात आहे. सविस्तर वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *