![]()
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान भाजप आमदार नारायण कुचे यांनी ‘ऑपरेशन टायगर’वर मोठे वक्तव्य केले आहे. दिल्लीत जे घडलं, तेच महाराष्ट्रातही होईल. राज्यात देखील ऑपरेशन टायगर होणार, असा दावा करत त्यांनी उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधला. नारायण कुचे म्हणाले, संजय राऊत यांना खासदारांचा हमीभाव कसा माहिती? त्यांना घेतले नाही तर त्यांना भाव कसा कळला? यामध्ये ते स्वतःही सामील असतील. त्यांनीच मागचं सरकार घालवलं आहे. राऊत हे सध्या बिनबुडाचे आरोप करत असून “डोक्यावर उलटे पडल्यासारखे काहीही बोलत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 2029 च्या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारही मिळणार नाहीत
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत कुचे म्हणाले, उद्धव ठाकरेंची परिस्थिती अशी झाली आहे की 2029 च्या निवडणुकीसाठी त्यांना उमेदवारही मिळणार नाहीत. 2024 ची लोकसभा निवडणूक हीच उद्धव ठाकरेंची शेवटची निवडणूक ठरेल. राज्यात सुरू असलेल्या ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चांमध्ये कुचे यांच्या या वक्तव्यामुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले असून ठाकरे गट आणि भाजप यांच्यातील आरोप-प्रत्यारोप अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. राऊतांच्या भाषेमुळेच ठाकरे गटाची वाट लागली- प्रतापराव जाधव शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील कथित ‘ऑपरेशन टायगर’च्या घडामोडींवर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी प्रतिक्रिया देताना हा ठाकरे गटाचा अंतर्गत विषय असल्याचे म्हटले आहे. त्याचवेळी त्यांनी खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार टीका करत त्यांच्या भाषेमुळेच ठाकरे गटाचे नुकसान होत असल्याचा आरोप केला. ऑपरेशन टायगरच्या चर्चांबाबत विचारले असता प्रतापराव जाधव म्हणाले, “खासदारांनी जे काही पत्र दिले आहे, तो शिवसेना (UBT) चा अंतर्गत विषय आहे. त्यावर लोकसभा अध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील. शिवसेना (UBT) च्या सहा खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी लोकसभा अध्यक्षांकडे अर्ज दिल्याच्या चर्चांदरम्यान जाधव यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन करण्याची गरज:ठाकरेंच्या शिवसेनेतील खदखद आता बाहेर पडतेय – चंद्रशेखर बावनकुळे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील खासदार फुटीच्या चर्चांदरम्यान महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. ठाकरे गटातील सध्याच्या घडामोडी या पक्षांतर्गत नाराजीचेच परिणाम असल्याचे सांगत त्यांनी उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटले. सविस्तर वाचा
दिल्लीनंतर महाराष्ट्रातही ऑपरेशन टायगर?:नारायण कुचेंचा मोठा दावा, म्हणाले- 2029 च्या निवडणुकीत ठाकरेंना उमेदवारही मिळणार नाहीत
