लासूरच्या दाक्षायणी देवीच्या यात्रेत गेल्या दोन दिवसांपासून भाविकांची गर्दी:वाढत्या तापमानामुळे दिवसाऐवजी रात्री मंदिरात येणे पसंत करताहेत भाविक
![]()
लासूर येथील देवी दाक्षायणी मातेच्या यात्रोत्सवात भाविकांची गर्दी वाढत आहे. दिवसा उन्हाचा पारा वाढल्याने रात्रीच्या वेळेला भाविकांची गर्दी होत आहे. त्यात रविवार सुट्टीचा दिवस आणि शुक्रवार व मंगळवार देवीचा वार असल्यामुळे भाविकांची दर्शनासाठी गर्दी वाढत
.
५ एप्रिल रोजी श्री देवी दाक्षायाणी मातेच्या वस्त्रालंकार विधीनंतर सुरुवात झालेल्या यात्रेत आतापर्यंत अडीच लाखांवर भाविकांनी मातेचे दर्शन घेतले आहे. सध्या वाढत्या तापमानामुळे दिवसाऐवजी रात्रीला भाविकांची पसंती दिली जात असल्याने गर्दी वाढत आहे.
