निम्मा महाराष्ट्र ‘40’ पार; उष्म्याचे 2 बळी:अकोल्यात देशातील सर्वाधिक 44.2 अंश तापमान
![]()
महाराष्ट्रातील १८ जिल्ह्यांतील तापमान ४० अंशाच्या पार गेले आहे. बुधवारी अकोला जिल्ह्यात देशातील सर्वाधिक ४४.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या १० पैकी ७ शहरे महाराष्ट्रातील आहेत. अकोला आणि हिंगोलीमध्ये उष्माघातामुळे दोघांचा बळी गेला. पुढील ३ दिवस राज्यातील बहुतांश शहरात उष्णचेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात विदर्भातील सर्व जिल्हे अक्षरश: लाल झाले, तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यातही कमाल तापमानात वाढ झाली. तीव्र उन्हामुळे वर्धा जिल्ह्यातील सर्व शाळांना सुटी जाहीर करण्यात आली. दुसरीकडे, देशातील सर्वात उष्ण १० शहरांत अनंतपूर -आंध्र प्रदेश (४३.४), प्रयागराज -उत्तर प्रदेश (४३) आणि राजनंदगाव -छत्तीसगड (४३) ही तीन शहरे आहेत. दरम्यान, हिंगोली बसस्थानकावर ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. शेख रफिक शेख उस्मान (रा. अनसिंग, ह. मु. जवळा बुद्रुक) असे मृत तरुणाचे नाव आहे.
संभाजीनगरसह १८ शहरात पारा ४० पार अकोला ४४.२ अमरावती ४४.० वर्धा ४३.९ नागपूर ४३.४ सोलापूर ४३.३ मालेगाव ४३.२ बीड ४३.१ यवतमाळ ४२.८ चंद्रपूर ४२.६ वाशिम ४२.६ बुलढाणा ४२.४ जळगाव ४२.३ गोंदिया ४२.० परभणी ४२.० सांगली ४१.८ धाराशीव ४१.० सातारा ४०.९ संभाजीनगर ४०.८ अवकाळीचाही इशारा : उष्णतेमुळे अवकाळी पाऊस पुन्हा परतण्याची शक्यता. शनिवार-रविवारी धाराशिव, लातूर, नांदेड, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, बीड व अहिल्यानगरमध्ये सौम्य ते वादळी पावसाची स्थिती. दिव्य मराठी एक्स्पर्ट श्रीनिवास औंधकर, संचालक, एमजीएम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र उन्हाळ्याच्या काळात जा तापमानवाढ हवी होती ती झाली नाही, ती आता होतेय. ही स्थिती फार काळ राहणार नाही. उष्णतेची ही लाट पुढील ४ ते ५ दिवस राहील. उन्हाळ्याची तीव्रता वाढली असली तरी उन्हाळ्याचे एकूण दिवस मात्र कमी झाले आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उष्णतेच्या तडाख्यातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
उष्माघाताचे २ बळी अकोल्यात जुने शहर भागात मालवाहू टेम्पोत मृतदेह आढळला. हिंगोली बसस्थानकावर ३० वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. हे दोन्ही बळी उष्म्याचे आहेत.
