मिरा-भाईंदरमध्ये झॉम्बी ड्रग्जचा सुळसुळाट:काय आहे हा अंमली पदार्थ? त्याला का म्हणतात झॉम्बी? स्थानिकांची कारवाईची मागणी

0
copy-of-db-temp-photo-resize-marathi-2026-04-15t12_1776236435.png




मुंबई लगतच्या मिरा भाईंदरमध्ये झॉम्बी ड्रग्जचा सुळसुळाट झाल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. या ड्रग्जच्या प्रभावाखाली असणारे लोक विचित्र हालचाली करताना स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे नागरिकांनी या ड्रग्जची पुरवठा साखळी शोधून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, बंगळुरू, बिहार व चंदीगडनंतर आता मिरा-भाईंदर शहरात कथित झॉम्बी ड्रगची प्रकरणे समोर येत आहेत. या अंमली पदार्थाच्या सेवनामुळे व्यक्तीचे वर्तन पूर्णतः अनियंत्रित होते. त्यामुळे संबंधित व्यक्ती विचित्र हालचारी करतात किंवा स्वतःला किंवा इतरांना इजा पोहोचवण्याचाही प्रयत्न करतात. मिरा भाईंमध्ये अशा प्रकारच्या 2 घटना घडल्या आहेत. त्यात 90 फूट रोड भाईंदर पश्चिम व स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे मैदानाच्या बाजूला हे ड्रग सेवन केलेली व्यक्ती आढळल्याची माहिती आहे. यासंबंधी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्थानिक नागरीक सामाजिक कार्यकर्ते व पालकवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे. सोशल मीडियात व्हिडिओ व्हायरल व्हायरल व्हिडिओतील तरुण नक्की कोण आहे? त्याने कोणत्या अंमली पदार्थांचे सेवन केले होते? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. काही दिवसांपूर्वीच मिरा भाईंदरमध्ये कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. त्यातच आता हा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे स्थानिकांत एकच खळबळ माजली आहे. प्रस्तुत ड्रगचा पुरवठा कुठून होत आहे? कोणत्या पुरवठा साखळीद्वारे तो शहरात पोहोचतो? याची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे. तज्ज्ञांच्या मते, झॉम्बी ड्रगच्या आहारी गेलेले लोक केवळ स्वतःच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावरच घातक परिणाम करत नाहीत, तर त्यांच्यामुळे समाजात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्नही उपस्थित होऊ शकतो. झॉम्बी ड्रग्ज म्हणजे नेमके काय? तज्ज्ञांच्या मते, झॉम्बी ड्रग्ज घेतलेल्या व्यक्तीची शुद्ध हरपते. संबंधित व्यक्ती तासनतास एकाच जागी पुतळ्यासारखी उभी राहते किंवा हिंसक हालचाली करते. या अंमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे शरीरावर तीव्र जखमा होतात. त्वचा कुजल्यासारखी दिसून लागते. त्यामुळेच त्याला झॉम्बी ड्रग्ज म्हटले जाते. हे ड्रग व्यक्तीच्या थेट मेंदू व मज्जासंस्थेवर हल्ला करते. त्यामुळे व्यक्तीचा मृत्यू होण्याचीही शक्यता बळावते. हे ही वाचा… सरकारने घेतले ‘फरार गँग’चे पालकत्व:आरोपी फरार झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज मिळाला, ठाकरे गटाच्या अंबादास दानवेंचा सवाल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्य सरकारने राज्यातील विविध प्रकरणातील फरार गँगचे पालकत्व घेतल्याची तिखट टीका ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी केली आहे. मुख्यमंत्री गुन्हेगारांना कडक शासन करण्याची आपली रेकॉर्डेट कॅसेट वाजवतात, पण प्रत्यक्षात अनेक प्रकरणातील आरोपी अद्याप सापडले नाहीत. हे आरोपी स्वतःहून गायब झाले की, त्यांना सरकारी सेफ पॅसेज देऊन गायब केले गेले? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. वाचा सविस्तर

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks