अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट:भोंदू अशोक खरातच्या संपर्कात अनेक राजकारणी, रूपाली चाकणकरांचे नाव आघाडीवर

0
copy-of-db-temp-cover-marathi-2026-04-15t122127792_1776235865.jpg




सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी भोंदू अशोक खरात प्रकरणात अनेक दिग्गज राजकारण्यांच्या नावांचा जाहीर खुलासा करत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून, यात एकनाथ शिंदे, सुनील तटकरे, जयंत पाटील आणि दीपक केसरकर यांच्यासह विशेषतः रूपाली चाकणकर यांचे नाव अग्रक्रमाने घेतले आहे. दमानिया यांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, खरातच्या कॉल लिस्टमध्ये रुपाली चाकणकर या सर्वात वरच्या स्थानी असून त्यांनी खरातला तब्बल 177 वेळा कॉल केला आणि त्यांच्यात 33 हजार 727 सेकंदांचे संभाषण झाले असल्याची माहिती दमानिया यांनी दिली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, भोंदू अशोक खरातकडे जाणारे अनेक राजकारणी होते. त्यातले काही राजकारणी एकाने सांगितले म्हणून गेले असतील. पण काही काही राजकारणी संधीसाधूपणा करायला आणि काही साध्य करायला नक्कीच गेले असतील. त्यामुळे मी जेवढे राजकारणी सापडले आहेत त्या यादीत ती यादी नुसती वाचून दाखवणार आहे. याचा अर्थ माझा त्यांच्यावर काही आक्षेप आहे असे नाही किंवा ते विकृत गोष्टीत सहभागी होते असेही म्हणता येत नाही. पण राजकारणी तिथे गेले हे मला नमूद करायचे आहे. जयंत पाटलांचे नाव वाचून वाईट वाटले पुढे बोलताना अंजली दमानिया यांनी राजकारणी लोकांचे तसेच त्यांच्याशी संबंधित लोकांचे नाव सांगितले. त्यात, नाशिकचे आमदार नितीन पवार, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत पाटील यांचे पीए मंगेश देशपांडे, उदय सांगळे जे सिन्नरमधून उभे होते पण ते हरले ते सुद्धा गेले होते. आमदार शिवाजी शहाणे, पद्मश्री पोपटराव पवार, रामदास खेडकर जे दादा भुसे यांचे पीए आहेत, दीपक केसरकर ज्यांचा नंबर सापडला होता व त्यांचे 19 कॉल होते. राहुल कोतडे जे ओएसडी आहेत विखे पाटलांचे. एकनाथ शिंदे यांचे तर नाव मी घेतले आहेच. प्रभाकर काळे, सुनील तटकरे आणि अजून एक नाव मला सापडले आहे ते आहे जयंत पाटील यांचे. मला हे नाव वाचून नक्कीच दुःख झाले. त्यांच्याकडू मला अशी अपेक्षा नव्हती. रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला सर्वाधिक 177 कॉल आता चाकणकर कुटुंबातले नाव घेताना अंजली दमानिया म्हणाल्या, रुपाली चाकणकर, मुलगा सोहम चाकणकर, तन्मय चाकणकर, प्रतिभा चाकणकर, प्रफुल चाकणकर, संकेत सायकर, या सगळ्यांचे कॉल्स सापडले. आता रुपाली चाकणकर यांनी काल एक फेसबूक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिले की माझ्यावर मीडिया ट्रायल झाली. जे धनंजय मुंडे म्हणाले होते तेच सेम त्यांनी म्हटले आहे. त्या पण सध्या धनंजय मुंडे प्रमाणे गायब आहेत. जसे धनंजय मुंडे यांच्यावर आरोप झाले तेव्हा ते गायब होते, आता चाकणकर गायब आहेत. त्यानंतर अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांनी खरातला केलेल्या संपूर्ण कॉल्सची यादी दाखवली. यात 177 कॉल आहेत. इनकमिंग कॉल 119 आहेत, तर आउटगोइंग कॉल 58 आहेत. अशोक खरातला कॉलवर सर्वाधिक जास्त बोलणारी व्यक्ती रूपाली चाकणकर आताच्या घटकेला जी यादी मी काढली आहे आणि पूर्वीची यादी जी आहे त्यात सर्वात जास्त अशोक खरातसोबत कॉलवर ज्या व्यक्तीचे बोलणे झाले आहे ती व्यक्ती म्हणजे रुपाली चाकणकर आहेत. त्या आधी खरातची मुलगी आहे, त्यात काही गैर नाही. पण चाकणकर या तब्बल 33 हजार 727 सेकंद या त्यांच्याशी बोलल्या, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली. रुपाली चाकणकर तुमचे काही काम नव्हते तर तुम्ही त्यांना कॉल करणाऱ्या टॉपवर कशा? असा सवालही दमानिया यांनी उपस्थित केल्या. तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर व अधिकाऱ्यांचेही कॉल्स पुढे अंजली दमानिया यांनी खरातला कॉल करणाऱ्यांची नावे सांगताना म्हटले की, तृप्ती, रुपाली चाकणकर, तिसरे आहेत दीपक लोंढे, चौथ्या क्रमांकावर कल्पना खरात आणि एक महत्त्वाचे नाव आहे. माझी एसआयटीकडे अशी मागणी आहे की जमिनी मिळवून देण्यासाठी ज्या काही अधिकाऱ्यांनी जी मदत केली त्यात दीपक लोंढे, हे केसरकर यांच्याही जवळचे आहेत. त्यानंतर बाळासाहेब बोराडे (एटोरे) हे डॉक्टर आहेत. यांच्याबद्दल मला पूर्ण माहिती नाही मिळाली, पण यांचा अतिशय विचित्र असा रोल आहे. सचिन सुंभाळे, नंदकिशोर काटोरे, राहुल देशमुख, अविनाश पोटे जे सिन्नर एमआयडीसीमध्ये ऑफिसर आहेत. यांची देखील चौकशी झाली पाहिजे. जवळजवळ यात तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, अधिकारी यांचे देखील यात समावेश आहे. प्रतिभा चाकणकरांवर टीका आता रुपाली चाकणकर म्हणाल्या की माझा त्यात काही हात नव्हता, मग रुपालीताई जे तुम्ही 5 तारखेला महिला आयोगाकडून जी नोटीस पाठवली होती आणि त्यात तातडीने म्हणजे 9 तारखेला त्याची हियरिंग घेतली, इतकी काय घाई झाली होती? एसआयटीने त्यांना बोलवायला पाहिजे होते, महिना झाला पण अजूनही चाकणकर यांना बोलावण्यात आले नाही. तरी मी पाठपुरावा करत राहणार. प्रतिभा चाकणकर हसत हसत म्हणाल्या की आम्हाला कोणी बोलावले नव्हते आम्हीच इथे फिरत फिरत आलो. माझ्याकडे जी काही माहिती येते ती पोलिसांकडे आधी पाठवत असते त्यानंतर मी माध्यमांसमोर आणते. त्या म्हणतात की आम्हाला नोटीस नव्हती पाठवली, हे सांगताना अंजली दमानिया यांनी प्रतिभा चाकणकरला पाठवलेली नोटीस दाखवली.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks