खुलताबाद तालुक्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मिरवणुका, गावागावांत अभिवादन

0
240_177616964369de32abe3702_khultabadjantihd.jpg




मंगळवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त खुलताबाद तालुक्यात सर्वत्र उत्साह, जल्लोष आणि सामाजिक ऐक्याचे प्रेरणादायी वातावरण पाहायला मिळाले. शहरासह तालुक्यातील विविध गावांमधून मोठ्या संख्येने मंडळांनी सहभाग नोंदवत भव्य आणि शिस्तबद्ध मिरवणुका काढल्या. या मिरवणुकांमधून समता, बंधुता आणि न्याय या विचारांचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. सकाळी शहरातील आंबेडकर चौक येथे आमदार सतीश चव्हाण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष नितीन जाधव यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंबेडकर स्मारकासमोर आमदार सतीश चव्हाण यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण, तर नगराध्यक्ष आमेर पटेल यांच्या हस्ते पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी तहसीलदार संतोष गुट्टे, मुख्याधिकारी समीर शेख व पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांची प्रमुख उपस्थिती होती. काही मंडळांनी ऐतिहासिक प्रसंगांचे देखावे सादर करून प्रेक्षकांचे लक्ष वेधले. ध्वजारोहण कार्यक्रमादरम्यान उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, माजी उपनगराध्यक्ष सुरेश मरकड, नगरसेवक गजेंद्र फुलारे, योगेश बारगळ, मुनीबोद्दीन मुजीबोद्दीन, अयाज बेग, माजी उपसभापती दिनेश अंभोरे, पुतळा समिती अध्यक्ष कारभारी ढवळे, नगरसेवक कैलास बारगळ, मोहन तुपे, परसराम बारगळ, वसंत शिरसाट, विरेंद्र वाघ, माजी सरपंच कृष्णा चव्हाण, आरपीआय तालुका अध्यक्ष फकिरराव भालेराव उपस्थित होते.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks