Bhushan Pradhan Wedding | अभिनेता भूषण प्रधानने गुपचूप उरकला साखरपुडा, कोण आहे होणारी बायको?
Bhushan Pradhan Wedding | हजारो मुलींचा क्रश मराठमोठा अभिनेता भूषण प्रधान लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांसोबत ही गुडन्यूज शेअर केली. एवढंच नाही तर त्याने गुपचूप साखरपुडाही उरकला आहे. त्यामुळे भूषणची होणारी बायको कोण आहे? याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे.
गुपचूप साखरपुडा आणि लग्नाची तारीख जाहीर
मराठी सिनेविश्वातील हँडसम अभिनेता भूषण प्रधान लवकरच नव्या आयुष्याची सुरुवात करणार आहे. सध्या त्याच्या लग्नाची बातमी सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे.
भूषणने स्वतः होणाऱ्या पत्नीसोबत एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. या फोटोमध्ये दोघेही अंगठी दाखवताना दिसत असल्याने त्यांचा साखरपुडा पार पडल्याचं स्पष्ट होतं. खास गोष्ट म्हणजे फोटोमध्ये त्याच्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा दिसत नाही. त्यामुळे “भूषणची होणारी पत्नी नक्की कोण?” हा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
अभिनेत्याने कॅप्शनमध्ये “आमच्या नव्या सुरुवातीचे साक्षीदार व्हा…” असं लिहित 24 जुलै 2026 ही लग्नाची तारीख जाहीर केली आहे. या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
भूषण प्रधान अफेअरच्या चर्चा
दरम्यान, भूषणच्या खासगी आयुष्याबाबत पूर्वीही चर्चा रंगल्या होत्या. विशेषतः अभिनेत्री Anusha Dandekar हिच्यासोबत त्याच्या रिलेशनशिपच्या बातम्या चर्चेत आल्या होत्या. त्यामुळे आता त्याची होणारी पत्नी अनुषा तर नाही ना? याबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.
कामाबद्दल बोलायचं झालं तर, भूषणने ‘घरात गणपती’, ‘लग्न कळ्ळोळ’, ‘जुनं फर्निचर’, ‘ऊन सावली’, ‘तू तिथे असावे’, ‘आम्ही दोघी’, ‘कॉफी आणि बरंच काही…’ अशा अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रिय असून त्याची मोठी फॅन फॉलोइंग आहे.
News Title: Bhushan Pradhan Wedding Date and Engagement News
