अखेर चिंचवणकरांची भटकंती थाबली; टॅँकर सुरू:ग्रामस्थांचा रोष पाहता प्रशासन हलले, महिलांचा संघर्ष काही प्रमाणात झाला कमी
![]()
चिंचवण (ता. सिल्लोड) गावातील महिलांनी ‘साहेब… जनावरांच्या हौदातील पाणी आम्ही चोरून आणतो!’ अशी व्यथा मांडली होती. पिण्याच्या पाण्यासाठी महिनाभर सुरू असलेल्या वणवणीनंतर गावात अखेर टँकरने पाणीपुरवठा सुरू झाला. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशा
.
गेल्या महिनाभरापासून गावात भीषण पाणीटंचाई होती. विहिरी कोरड्या पडल्या. तलावही आटले. महिलांना, लहान मुलांना दररोज अनेक किलोमीटर पाणी आणण्यासाठी भटकावे लागत होते. काही वेळा जनावरांसाठी साठवलेले पाणी वापरण्याची वेळ आली. टँकरसाठी प्रस्ताव पाठवला होता. तहसील स्तरावर मंजुरी रखडली. ग्रामस्थांचा संताप वाढला होता. ही बाब ‘दिव्य मराठी’त झळकताच प्रशासन हलले. गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी तातडीने दखल घेतली. मंजुरीची वाट न पाहता चिंचवणसाठी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू केले. महिलांचा संघर्ष काही प्रमाणात कमी झाला. ग्रामस्थांनी प्रशासनाचे आभार मानले. जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी पाणीटंचाई निवारणासाठी निर्णय घेतला. पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाच्या शासन निर्णयांच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व संबंधित उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांना टँकर मंजुरीचे अधिकार देण्यात आले. टँकर मंजुरीसाठी कडक अटी घालण्यात आल्या. प्रस्तावाची पडताळणी बंधनकारक केली. जीपीएस प्रणाली अनिवार्य केली. प्रत्येक खेपेनुसार नोंद ठेवणे बंधनकारक केले. प्रत्यक्ष पाणीपुरवठ्याची तपासणीही आवश्यक केली. टँकरचे वेळापत्रक गावकऱ्यांना कळवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. चिंचवण प्रकरणामुळे प्रशासन सतर्क झाले. टंचाईग्रस्त भागांना तातडीने दिलासा देण्यासाठी निर्णय प्रक्रियेला गती मिळाल्याचे स्पष्ट झाले.
प्रस्तावाची पडताळणी करणे आता सर्वांना बंधनकारक
