समृद्धीवर अपघातानंतर पेटलेल्या कारमध्ये संभाजीनगरच्या आर्किटेक्टचा होरपळून मृत्यू:जांबरगाव शिवारात दुर्घटना; पत्नी, मुलगी गंभीर जखमी
![]()
समृद्धी महामार्गावर ट्रकवर कार मागून आदळल्याची घटना सोमवारी सायंकाळी ६.६० वाजता जांबरगाव शिवारात घडली. या अपघातानंतर कारने पेट घेतला. त्यात छत्रपती संभाजीनगर येथील आर्किटेक्ट पवन वर्धमान अजमेरा (५०)यांचा कारमध्येच होरपळून मृत्यू झाला. तर त्यांच्या पत
.
अजमेरा कुटुंबीय क्रेटा कारने (एमएच २० एफयू ४५२७) मुंबईहून छत्रपती संभाजीनगरकडे येत होते. वाटेत जांबरगाव शिवारात त्यांची कार ट्रकवर मागून आदळली. त्यानंतर काही क्षणांतच कारने पेट घेतला. अपघातात पवन यांचे पाय कारच्या पुढील भागात अडकल्याने त्यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर त्यांच्या जखमी पत्नी रीना आणि मुलगी ईशा यांना रात्री ९ वाजता उपचारासाठी संभाजीनगरला पाठवण्यात आले.
क्षणार्धात कार जळाली, त्यामुळे मदत करता आली नाही
अपघाताची माहिती मिळताच मी घटनास्थळी पोहोचलो. अपघात इतका भीषण होता की, काही क्षणांतच कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आगीच्या ज्वाळा वाढेपर्यंत मायलेकी कारबाहेर पडल्या होत्या. मात्र, पुढील काही मिनिटांत कार ज्वाळांनी वेढली. त्यामुळे अजमेरा यांना बाहेर काढण्यासाठी काहीच करता आले नाही.’ शांतिलाल पहाडे, वैजापूर
