औषध दुकानात कर्मचाऱ्याकडून दहा लाख रुपयांचा अपहार:डॉक्टरांची पुणे स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद, गुन्हा दाखल

0
09e41af0-f2f8-4864-b229-9a80b0863c1a_1776084869541.jpg




पुण्यात स्वारगेट येथील एका औषध विक्री दुकानातील कर्मचाऱ्याने १० लाख २६ हजार रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी स्वारगेट पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दुकानाच्या मालक असलेल्या एका डॉक्टरांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आकाश रामधन ढगे (रा. येवलेवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार डॉक्टरांचे स्वारगेट भागातील मुकुंदनगर परिसरात औषध विक्रीचे दुकान आहे. ढगे हा या दुकानात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत होता. गेल्या वर्षभरात ढगे याने औषध विक्रीतून जमा झालेल्या रकमेचा वेळोवेळी अपहार केला. डॉक्टरांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्याने एकूण १० लाख २६ हजार रुपयांचा अपहार केल्याचे म्हटले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्मिता पाटील करत आहेत. कार्यालयातून 1 लाख 61 हजारांचे लॅपटॉप, मोबाईची चोरी हडपसर येथील क्रिएटिव्‍ह कट्टा ॲडर्वटायझींग या डिजिटल मार्केटिंग एजन्सीच्‍या कार्यालयाचा दरवाजा उघडा ठेऊन झोपी गेले असताना अज्ञात चोरट्यांनी आत प०वेश करून 1 लाख 61 हजारांचा मुद्देमाल चोरी करून नेला. यामध्ये दोन लॅपटॉप, एक आयपॅड आणि एक ड्रोन कॅमेरा व कॅमेरा सेटअप साहित्‍य होते. याबाबत वैभव भिमराव थोरबोले (25, रा. भंडलकरनगर, शेवाळवाडी, पुणे) यांनी दिलेल्‍या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 11 एप्रिल रोजी रात्री एक ते सकाळी साडे आठ वाजण्याच्‍या सुमारास घडला. पुढील तपास हडपसर पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed