पुण्यात तरुणाचा खून, भवानी पेठेत धारदार शस्त्राने वार:पूर्ववैमनस्यातून घटना; खडक पोलिसांनी चौघांना केली अटक

0
d0dfe2b5-9900-47b4-8685-f06253ff82e9_1776079011182.jpg




पुण्यातील भवानी पेठेतील काशेवाडी भागात पूर्ववैमनस्यातून एका १८ वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी खडक पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. अबूबकर अमजद खान (वय १८, रा. एडी कॅम्प चौक, नाना पेठ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी अम्मार शेख (वय १९, रा. चुडामण तालमीजवळ, भवानी पेठ), कमरअली सय्यद (वय १८, रा. विमाननगर), तुफेल सय्यद (वय १९) आणि अबूझर कुरेशी (वय १८, रा. काशीवाडी, भवानी पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. अल्तमश अन्सार पिंजारी (वय १९, रा. मोमीनपुरा, घोरपडे पेठ) याने खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अबूबकर आणि आरोपींमध्ये यापूर्वी वाद झाला होता. घटनेच्या दिवशी अबूबकर आपल्या मित्रांसह काशीवाडी भागातील त्रिकोणी उद्यानाजवळ थांबला होता. त्याचवेळी आरोपी धारदार शस्त्रे घेऊन तिथे आले. आरोपींनी अबूबकर आणि त्याच्या मित्रांना शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्यांनी अबूबकरवर धारदार शस्त्राने अनेक वार केले, ज्यामुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त कृषीकेश रावले, उपायुक्त विवेक मासाळ आणि सहायक आयुक्त अनुजा देशमाने यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या अबूबकरला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी तातडीने पसार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षक शर्मिला सुतार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

वार्ताहार/प्रतिनिधी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

Enable Notifications OK No thanks