Smartphone Prices Hike | मोबाईलच्या किमतीत मोठी वाढ; जाणून घ्या कोणत्या कंपनीचे फोन किती महाग झाले?
Smartphone Prices Hike | एप्रिल महिन्यात स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. देशातील जवळपास सर्वच मोठ्या मोबाईल कंपन्यांनी आपल्या फोनच्या किमतीत 3% ते 22% पर्यंत वाढ केली आहे. All India Mobile Retailers Association (AIMRA) कडून मिळालेल्या माहितीनुसार, ही दरवाढ गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने होत आहे.
Samsung : 3% ते 22% वाढ
Xiaomi : 3% ते 15% वाढ
OPPO व POCO : 6% ते 18% वाढ
Nothing : 13% ते 14% वाढ
Motorola : 4% ते 9% वाढ
Vivo : 15 एप्रिलपासून दरवाढ अपेक्षित
Apple : iPhone मॉडेल्सवरील सवलती कमी
Smartphone Prices Hike | दरवाढीमागची 4 मोठी कारणे :
– AI चिप्सची टंचाई: कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) वापर वाढल्याने चिप्सची मागणी वाढली
– मध्यपूर्वेतील तणाव: वाहतूक व विमा खर्चात वाढ
– रुपयाची घसरण: डॉलरच्या तुलनेत रुपया कमजोर झाल्याने आयात महाग
– कच्च्या मालाचे वाढलेले दर: प्लास्टिक आणि मेमरी घटक महागले
दरवाढीचा थेट परिणाम विक्रीवर दिसून येत आहे. मार्च महिन्यात मोबाईल विक्रीत सुमारे 30% घट झाली आहे. त्यामुळे अनेक ग्राहक आता नवीन फोन घेण्याऐवजी सेकंड-हँड मोबाईलकडे वळत आहेत किंवा किंमती कमी होण्याची वाट पाहत आहेत.
