स्पर्श प्रणालीमुळे पैठण तालुक्यात एक हजार घरकुलाचे हप्ते रखडले:दुसऱ्या हप्त्यासाठी लागतोय ४५ दिवसांचा कालावधी, त्यात आता हप्तेही ठप्प
![]()
प्रतिनिधी | पैठण पैठण तालुक्यात विविध शासकीय घरकुल योजनेंतर्गत मंजूर झालेल्या सुमारे एक हजार घरकुलांच्या हप्त्यांचे वितरण गेल्या दोन महिन्यांपासून रखडले आहे. लाभार्थींमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्पर्श प्रणालीमुळे हप्ते वेळेत न मिळाल्यामुळे अनेकांनी सुरू केलेली घरकुलांची कामे सध्या अर्धवट अवस्थेतच थांबली आहेत. यात पहिला हप्ता पडल्यानंतर दुसऱ्या हप्ताची रक्कम मिळवण्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागतोय व आता स्पर्श प्रणालीमुळे आता हप्ते रखडले आहेत. पैठण तालुक्यात सध्या १२ हजारहून अधिक पंतप्रधान, रमाई, शबरीसह विविध घरकुलाच्या योजनेच्या घरकुलाचे कामे सुरू आहेत. घरकुल मंजूर झाल्यानंतर ग्रामीण भागातील लाभार्थींनी मोठ्या अपेक्षेने घरकुलांची उभारणी सुरू केली. मात्र, निधीअभावी बांधकाम ठप्प झाले आहे. काही ठिकाणी पाया व भिंतीपर्यंत काम झाले असून छताचे काम प्रलंबित आहे, तर काही लाभार्थींनी कर्ज काढून काम सुरू ठेवले आहे. घराचा हप्ता न आल्याने घराचे काम अपूर्ण आहे. छाया : रमेश शेळके तालुक्यात १२ हजारच्या जवळपास विविध योजनांचे घरकुल मंजूर झाले. यात शेकडो लाभार्थींकडे मोठमोठी घरे असतानादेखील घरकुल मंजूर झाले अशा लाभार्थींनी ना घरे बांधली ना ती रद्द करण्यासाठी काही केले. आता सामान्य लाभार्थींना मात्र शासकीय नियम व तांत्रिक अडचणीमुळे आपले घरकुल अर्धवट राहिले, अशा भावना अनेक लाभार्थींनी व्यक्त केल्या आहेत. ^पैठण तालुक्यातील एक हजार घरकुलाचे हप्ते काही तांत्रिक अडचणीमुळे रखडले आहेत. शिवाय पैसे टाकल्यानंतर त्यासाठी ४५ दिवसांचा कालावधी लागत आहे. या अडचणी दूर झाल्यावर लाभार्थींना वेळेत घरकुलाचे हप्ते पडतील. -राजेंद्र कांबळे, सहायक गटविकास अधिकारी, पैठण लाभार्थींपुढे मोठे संकट उभे राहिले आहे. ‘हप्ते तत्काळ सुरू करून प्रलंबित रक्कम वितरित करावी, प्रशासनाने तांत्रिक अडचणी त्वरित दूर करून घरकुलधारकांना दिलासा द्यावा. -विजय गायकवाड, सरपंच, नांदर. वाढत्या बांधकाम खर्चामुळे त्यांच्यावर आर्थिक ताण वाढत आहे. दरम्यान, संबंधित विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, एसएमयूआरएच कार्यालयाच्या एसएनए ‘स्पर्श’ प्रणालीमध्ये Fund Transfer Order प्रक्रिया तांत्रिक कारणांमुळे बंद झाल्याने निधी वितरण थांबले आहे. ही तांत्रिक अडचण दूर होईपर्यंत पेमेंट सुरू होणार नसल्याचे संकेत मिळत आहेत. घरकुल तर मिळाले, मात्र अनेक अडचणी तालुक्यातील प्रत्येक गावात पन्नासहून अधिक घरकुल मंजूर करण्यात आली.
