फेरफार नोंदींमध्ये अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अमरावती तहसील कार्यालयातील तलाठी संतोष गणेशराव चपटे यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ नुसार ही कारवाई केली. निलंबन तत्काळ लागू झाले आहे. निलंबन काळात चपटे यांचे मुख्यालय मेळघाटमधील धारणी येथे राहील. तहसीलदार, धारणी यांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. या काळात त्यांना नियमानुसार निर्वाह भत्ता मिळेल. तसेच, त्यांना खासगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही. प्रशासनाने चपटे यांना कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यांनी सादर केलेले स्पष्टीकरण असमाधानकारक ठरल्याने जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी निलंबनाची कारवाई केली. चपटे यांच्या कार्यकाळातील तक्रारी तपासण्यासाठी एसडीओ अनिल भटकर यांच्यामार्फत निवासी नायब तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. समितीच्या तपासात मौजा वडाळी आणि मौजा बेनोडा येथील फेरफार प्रकरणांमध्ये मंडळ अधिकाऱ्यांचा निर्णय किंवा मंजुरी नसताना अधिकार अभिलेखावर अंमल दिल्याचे आढळले. काही फेरफार क्रमांकांचे तपशील कोरे ठेवणे आणि एकाच क्रमांकावर दोन नोंदी घेणे असे प्रकारही समोर आले.

What do you feel about this post?

0%
like

Like

0%
love

Love

0%
happy

Happy

0%
haha

Haha

0%
sad

Sad

0%
angry

Angry

By admin

You missed

Home
Account
Cart
Search