ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना हृदयविकाराचा झटका:ब्रीज कँडी रुग्णालयात दाखल, डॉक्टरांकडून आयसीयूमध्ये उपचार सुरू
![]()
भारतीय संगीत क्षेत्रातील अढळ स्थान असलेल्या ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांची प्रकृती शनिवारी अचानक बिघडली. हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांना मुंबईतील प्रसिद्ध ब्रीच कँडी रुग्णालयात तातडीने दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ‘अत्यावश्यक वैद्यकीय कक्षात’ (ICU) उपचार सुरू आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी आशा भोसले यांना हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. प्रकृती चिंताजनक वाटू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले असून, त्यांच्या आरोग्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबतची सविस्तर माहिती अद्याप समोर आली नाही. ब्रीच कँडी रुग्णालय प्रशासन किंवा भोसले कुटुंबीयांकडून अद्याप कोणतेही अधिकृत वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत नेमकी किती सुधारणा झाली आहे, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दरम्यान, आशाताईंना रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त समजताच जगभरातील संगीतप्रेमींकडून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली जात आहे. आम्ही हे वृत्त सातत्याने अपडेट करत आहोत…
