Vaibhav Suryavanshi | “वैभव सूर्यवंशीला टीममध्ये घेऊ नका!”, अनिल कुंबळेंच्या ‘त्या’ विधानाने क्रिकेट विश्वात खळबळ
Vaibhav Suryavanshi | सध्या IPL 2026 मध्ये तुफानी फलंदाजीने चर्चेत असलेला वैभव सूर्यवंशी पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मात्र यावेळी त्याच्या खेळामुळे नव्हे, तर अनिल कुंबळे यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे.
कुंबळे यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, वैभव सूर्यवंशीला लगेचच भारतीय संघात स्थान देण्याची घाई करू नये. त्याला अजून वेळ देणं आवश्यक आहे, असं त्यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
संजय कुमार झा यांनी कुंबळे (Anil Kumble) यांच्या मताला विरोध दर्शवला आहे. त्यांनी उदाहरण देताना सांगितले की, सचिन तेंडुलकर यांनी अवघ्या 16 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तसेच पेले आणि लिओनेल मेस्सी यांनीही लहान वयात मोठी कामगिरी केली.
त्यामुळे “प्रतिभेला वयाचं बंधन नसतं” असं म्हणत वैभवला लवकर संधी देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
Vaibhav Suryavanshi | कुंबळे नेमकं काय म्हणाले? :
अनिल कुंबळे यांच्या मते, वैभव सूर्यवंशी (Vaibhav Suryavanshi) हा अत्यंत प्रतिभावान खेळाडू आहे. मात्र त्याच्यावर लगेचच आंतरराष्ट्रीय स्तराचा दबाव टाकणे योग्य ठरणार नाही. “लोकांच्या अपेक्षांमुळे त्याच्यावर अतिरिक्त ताण येऊ शकतो. त्याच्याकडे अजून भरपूर वेळ आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या संपूर्ण प्रकरणामुळे क्रिकेट विश्वात नव्या चर्चेला उधाण आलं आहे. एका बाजूला तरुण खेळाडूला त्वरित संधी देण्याची मागणी होत आहे, तर दुसरीकडे संयम बाळगण्याचा सल्ला दिला जात आहे.
