शेतीत नवनवीन प्रयोग करून पारंपरिक पिकातूनही शेतकरी सोन्यासारखा नफा कमावू शकतो, याचा उत्तम वस्तुपाठ आमोदा (ता. यावल) येथील प्रगतिशील शेतकरी कुणाल तोताराम चौधरी यांनी घालून दिला आहे. पिढीजात शेतीचा वारसा जपत त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भरिताच्या वांग्याची यशस्वी शेती फुलवली. चौधरी हे दरवर्षी सुमारे 65 गुंठे क्षेत्रात तीन हजार गावरान रोपांची लागवड करतात. खतांचा संतुलित वापर स्थानिक बाजारपेठेतील मागणी ओळखून त्यांनी घरगुती गावरान बियाण्यांचा वापर केला आहे. जून-जुलै महिन्यात 5 बाय 5 फुटांच्या अंतरावर रोपांची लागवड करून संपूर्ण शेताचे नियोजन केले आहे. आधुनिक पाणीटंचाईच्या काळात पिकाला आवश्यक ओलावा टिकवण्यासाठी त्यांनी ठिबक इनलाइन सिंचन पद्धतीचा वापर केला आहे. तसेच, जमिनीची प्रत आणि पिकाच्या गरजेनुसार प्रत्येक पंधरा दिवसांनी शेणखतासह 10:26:26 मिश्र खत आणि विद्राव्य खतांचा संतुलित वापर केला जातो. व्यापाऱ्यांची थेट शेतातून खरेदी कीड व रोगांच्या नियंत्रणासाठी नियमित पाहणी करून कृषी तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली रासायनिक व जैविक फवारण्या केल्या जातात. लागवडीपासून साधारण सहा ते सात महिने चालणाऱ्या या हंगामात दर चार दिवसांनी 3 ते 5 क्विंटल वांग्यांची तोडणी होते. वेळेवर फळे तोडल्यामुळे वांग्यांचा ताजेपणा व दर्जा टिकून राहतो. दर्जेदार उत्पादनामुळे व्यापारी थेट शेतात येऊन माल खरेदी करतात, तर काही माल फैजपूर, भुसावळ आणि सावदा बाजारात पाठवला जातो. व्यवस्थापन अन् काटकसर उपयोगी दरम्यान, हवामानातील बदल आणि बाजारभावातील चढ-उतार यांसारखी आव्हाने असली, तरी योग्य व्यवस्थापन आणि काटकसरीमुळे ही शेती फायदेशीर ठरत आहे. कमी पाण्यात दर्जेदार उत्पादन घेत कुणाल चौधरी यांनी इतर शेतकऱ्यांसमोर आर्थिक समृद्धीचा एक नवा मार्ग उघडा केला आहे. वांगे उत्पादनाचा आर्थिक ताळेबंद आमोदा येथील शेतकरी कुणाल चौधरी यांनी 65 गुंठे क्षेत्रात भरिताच्या वांग्याची यशस्वी शेती फुलवून आटोपशीर खर्चात भरघोस कमाईचा मार्ग दाखवला आहे. या शेतीतून त्यांना वार्षिक 30 ते 35 टन उत्पादन मिळते, ज्याची 7 लाख रुपयांपर्यंत विक्री होते. यामध्ये बियाणे, खते, औषधे, मजुरी आणि सिंचनापोटी 1 ते 1.5 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. हा सर्व खर्च वजा जाता त्यांना वर्षाकाठी 5 ते साडेपाच लाख रुपयांचा शुद्ध नफा मिळतो. (प्रगतिशील शेतकरी कुणाल चौधरी यांचा मोबाइल नंबर : 8237867966) What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 5 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी:पुणे, अहिल्यानगर, सातारा, बीडमध्ये सरी बरसल्या, हिंजवडीत रस्ते जलमय, तर शेतकऱ्यांना दिलासा अमरावतीत 350 विद्यार्थ्यांनी नशामुक्तीचा संकल्प केला:मातोश्री विमलाबाई देशमुख महाविद्यालयात ‘नशामुक्त भारत अभियान’अंतर्गत जनजागृतीपर व्याख्यान