मल्लिकार्जुन अन् पाचपीर देवाच्या यात्रेला सुरुवात:बोरेगांव यात्रेमुळे हिंदू- मुस्लिम समाजात एकोपा
![]()
अक्कलकोट तालुक्यातील बोरेगाव येथील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन व पाचपीर देवाच्या यात्रेस गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला आहे. गुरुवारी श्री मल्लिकार्जुन देवास रुद्राभिषेक घालण्यात आले. त्यानंतर मूर्तीला १०८ बिल्व अर्पण करण्यात आले आहे. पाचपीर देवास गलिपधारण करण्यात आले आहे. त्यानंतर मज्जलसी हा मुख्य धार्मिक कार्यक्रम संपन्न झाला. शुक्रवार दि. १० एप्रिल रोजी पहाटे पाच वाजता पाचपीर देवास दंडवत घालण्यात येणार आहे. त्यानंतर नैवेद्य अर्पण करण्यात येईल सकाळी ८ वाजता श्री मल्लिकार्जुन देवाची पालखी व काठी मिरवणूक काढण्यात येणार आहे. सकाळी १० वाजता हालचिंचोळी येथील श्री माऊली हरिभजन मंडळ व सोलापूर येथील शिवशक्ती भजन मंडळाचे गायक महांतेश घंटे, राजश्री तानवडे, रेणुका हत्ते यांचा भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे, रात्री नऊ वाजता स्वरसाधना ऑर्केस्ट्रा कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि.११ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता जय हनुमान भजन मंडळ ( आलूर) व गेनसिद्ध पारिजात भजन मंडळ (कुंभारी) यांचा भजन कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी ५ वाजता जंगी कुस्त्यांचे फड रंगणार आहे. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद वाटप करण्यात येईल, रात्री ९ वाजता हुट्टीत मगा विषवाद साकु मगा अमृतवाद हे कौटुंबिक कन्नड नाटक सादर करण्यात येणार आहे. तरी बोरेगाव परिसरातील भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा, असे आवाहन यात्रा समिती व ग्रामस्थांनी केले आहे.
