शरद पवार गटाला धक्का:फुलंब्री पं. स. उपसभापतींचा भाजपत प्रवेश
![]()
तालुक्याच्या राजकारणात गुरुवारी मोठी उलथापालथ झाली. काँग्रेसच्या तिकीट वाटपावर नाराज होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून पंचायत समिती निवडणूक लढवलेल्या उपसभापती अश्विनी आजिनाथ सोनवणे यांनी समर्थकांसह भाजपत प्रवेश केला. खामगाव येथे माजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार अनुराधा चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. खामगावला भाजपतर्फे नवनिर्वाचित पं.स. सदस्य, सभापती, उपसभापती यांचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या वेळी जि.प. उपाध्यक्ष जितेंद्र जयस्वाल, गोपाल वाघ, निखिल चव्हाण उपस्थित होते. पंचायत समिती सभापती सर्जेराव मेटे, सुरेश बनकर, ज्ञानेश्वर मोटे उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी जि.प. सदस्य गंगाधर पाटील सोनवणे यांनीही भाजपचा झेंडा हाती घेतला. आता सासरे आणि सून दोघेही भाजपत गेल्याने तालुक्यात काँग्रेसला धक्का बसला. काँग्रेससमोर मोठे आव्हान तालुक्यात ५१ ग्रा.पं.च्या निवडणुका होणार असून या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला बसलेला हा धक्का आगामी काळात तालुक्याच्या राजकारणाला नवी दिशा देणारा ठरणार आहे.
