फायनान्सच्या वसुलीचा मुद्दा ऐरणीवर; मृत चंद्रकांत शिंदे नेमके कोणत्या फायनान्सचे ग्राहक होते, याबाबत नवा प्रश्न नांदेड (प्रतिनिधी) – शेतकरी हत्या प्रकरणातील नऊ आरोपींपैकी आज सहा आरोपींच्या पोलीस कोठडीची मुदत संपली. त्यापैकी शेख अहमद उर्फ अस्लम मोहम्मद बशीर याच्या पोलीस कोठडीत मुख्य न्यायदंडाधिकारी भाऊसाहेब मोरे यांनी आणखी दोन दिवसांची वाढ केली आहे. तर या प्रकरणातील फायनान्सचे अध्यक्ष, मंटू मेजर आणि अन्य दोन आरोपी असे एकूण तीन जण २ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी आज न्यायालयात सादर केलेल्या कागदपत्रांमधून या प्रकरणात एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. पोलीस कोठडी वाढविण्यात आलेला आरोपी शेख अहमद उर्फ अस्लम मोहम्मद बशीर हा संबंधित फायनान्सव्यतिरिक्त अन्य एका फायनान्स कंपनीचीही वसुली करत असल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे मृत चंद्रकांत शिंदे हे नेमके कुबेर फायनान्सचे ग्राहक होते की अन्य कोणत्या फायनान्स कंपनीचे, असा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिंदे हे दुसऱ्या फायनान्सचे ग्राहक असतील, तर त्यांना कुबेर फायनान्समध्ये का आणण्यात आले? तसेच त्यांची हत्या त्याच ठिकाणी का करण्यात आली? या प्रश्नांची उत्तरे आता तपासातून समोर येणे महत्त्वाचे ठरणार आहे. या नव्या माहितीमुळे शेतकरी हत्या प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता असून, फायनान्स वसुलीचे नेमके जाळे आणि हत्येमागील कारण शोधण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. Post Views: 20 Facebook WhatsApp Telegram Twitter LinkedIn Snapchat Threads Post navigation What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 9 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation ३७ व्या नांदेड जिल्हा पोलीस क्रीडा स्पर्धा २०२६ चा दिमाखदार समारोप; पोलीस मुख्यालय नांदेड संघाला सर्वसाधारण विजेतेपद रविवारी नांदेडमध्ये डॉ. विलासराज भद्रे यांना श्रद्धांजली सभा