[ads1] बंगळुरूच्या 5-स्टार कॉनराड हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी विजेचा धक्का लागल्याने दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. ही घटना हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या पूलमध्ये घडली. मृतांची ओळख 57 वर्षीय जर्मन नागरिक अलेक्झांडर मॅक्सिमिलियन थाइस आणि 45 वर्षीय स्लोव्हाकियाचा नागरिक ज्युराज होर्वाट अशी झाली आहे. दोघेही हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. दोघांना वाचवण्याच्या प्रयत्नात एका अमेरिकन नागरिकासह हॉटेलचा पूल अटेंडंट जखमी झाला. दोघांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. शुक्रवारी संध्याकाळी घडला अपघात जर्मन नागरिक अलेक्झांडर मॅक्सिमिलियन थाइस लुफ्थांसा एअरलाइन्समध्ये क्रू मेंबर होते. स्लोव्हाकियाचे नागरिक जुराज होर्वाट टेक कंपनी IBM मध्ये प्रोजेक्ट मॅनेजर होते. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, दोघेही शुक्रवारी संध्याकाळी पोहण्यासाठी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या स्विमिंग पूलमध्ये गेले होते. याचदरम्यान त्यांना कथितरित्या विजेचा धक्का बसला. वाचवण्यासाठी धावलेले दोन जण जखमी हॉटेलमध्ये थांबलेले 41 वर्षीय अमेरिकन नागरिक मॅथ्यू डीसेंटिस आणि भारतीय पूल अटेंडंट 28 वर्षीय राहुल तिवारी यांनी दोघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोघेही जखमी झाले. मॅथ्यू डीसेंटिस आणि राहुल तिवारी यांना मणिपाल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. दोघांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे सांगण्यात आले आहे. गुन्हा नोंदवून पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे. हॉटेल व्यवस्थापनाकडून अद्याप या घटनेवर कोणतेही निवेदन आलेले नाही. शनिवारी सकाळी हॉटेलच्या वेबसाइटवर स्विमिंग पूल 31 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत ‘देखभालीसाठी बंद’ राहणार असल्याची माहिती देण्यात आली. हे कॉनराड हिल्टन ग्रुपचे आलिशान 24 मजली 5-स्टार हॉटेल आहे. येथे स्टँडर्ड रूममध्ये राहण्याचा खर्च किमान 25 हजार रुपये प्रति रात्र आहे. [ads2] What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 10 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation Punjab AAP Candidate List | Bhagwant Mann Election 2027 Ticket Update CBSE Syllabus Update | Class 9 & 10 Subjects Change & Optional List