ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या राष्ट्रीय महामंत्रीपदी पुण्याचे धनंजय चंद्रात्रे यांची बिनविरोध निवड झाली. पश्चिम बंगालमधील सिलिगुडी येथे ३१ ऑक्टोबर आणि १ नोव्हेंबर रोजी झालेल्या संघटनेच्या राष्ट्रीय अधिवेशनात ही निवड करण्यात आली. देशभरातील विविध रेल्वे विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांमधील हजारो स्टेशन मास्टर या अधिवेशनात सहभागी झाले होते. ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अधिवेशन दर दोन वर्षांनी आयोजित केले जाते. यावेळी संघटनेच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. देशभरात सुमारे ३४ हजार स्टेशन मास्टर कार्यरत असून, त्यांच्या समस्या आणि प्रलंबित मागण्यांसाठी ही संघटना काम करते. माजी पंतप्रधान आणि भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांनी या संघटनेची स्थापना केली होती. त्यांनी सुमारे १४ वर्षे संघटनेचे नेतृत्व केले. स्टेशन मास्टरांच्या विविध प्रश्नांसाठी संघटनेच्या माध्यमातून आंदोलने आणि पाठपुरावा केला जातो. रेल्वे गाड्यांची वाढती संख्या, कामाचा वाढलेला व्याप, अपुऱ्या मनुष्यबळामुळे निर्माण होणारा ताण आणि कामाच्या ठिकाणी येणाऱ्या प्रशासकीय अडचणी ही स्टेशन मास्टरांसमोरील प्रमुख आव्हाने आहेत. त्याचबरोबर आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी, रिक्त पदांची मोठी संख्या, वाढता कामाचा ताण आणि अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या कथित मनमानी कारवाईसारख्या मुद्द्यांवर संघटनेला काम करावे लागणार आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रात्रे यांच्यावर राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्वाची महत्त्वपूर्ण जबाबदारी आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल देशभरातील रेल्वे कर्मचाऱ्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे. ऑल इंडिया स्टेशन मास्टर असोसिएशनच्या पुणे मंडळाचे सचिव दिनेश कांबळे आणि अध्यक्ष पुरुषोत्तम सिंग यांनीही चंद्रात्रे यांचे अभिनंदन केले. What do you feel about this post? 0% Like 0% Love 0% Happy 0% Haha 0% Sad 0% Angry Views: 4 Facebook WhatsApp Twitter/X LinkedIn Post navigation अमरावती जिल्ह्यातील 848 गावांना पाणीटंचाईचा अंदाज:प्रशासनाचा 31 कोटी 50 लाखांचा आराखडा; 1795 उपाययोजना राबवणार अमरावतीत 28 फेब्रुवारीला सामूहिक विवाह सोहळा:सूर्यकांतादेवी पोटे ट्रस्टकडून आयोजन; शेतकरी आणि शेतमजुरांना प्राधान्य, नोंदणी 25 जानेवारी 2027 पर्यंत