सोनू कल्याणकारच्या मारेकऱ्याच्या पायात यासाठी गोळी मारावी लागली
नवीन नांदेड (प्रतिनिधी)- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर गोळीबार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी प्रत्युत्तरात्मक कारवाईत जखमी करून ताब्यात घेतले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सोनू कल्याणकर खून प्रकरणातील संशयिताचा शोध सुरू असताना संबंधित आरोपी मोटारसायकलवरून पळ काढत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने संशयिताचा पाठलाग सुरू केला. झरी ते पांगरी रस्त्यावर पोलिसांनी वारंवार थांबण्याचा इशारा दिल्यानंतरही आरोपीने वेग वाढवत पलायन सुरूच ठेवले.
दरम्यान, पोलिस जवळ पोहोचताच आरोपी अंकुश गंडपवाड कंबरेला लपवून ठेवलेले गावठी पिस्तूल काढून पोलिसांच्या दिशेने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. पहिला प्रयत्न निष्फळ ठरला. मात्र पुन्हा गोळी झाडण्याचा प्रयत्न करत असताना पोलिस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी प्रसंगावधान राखत केलेल्या कारवाईत आरोपीच्या पायाला गोळी लागली. जखमी अवस्थेत आरोपीला ताब्यात घेण्यात आले.एफ आय आर मध्ये सखोल लिहिले आहे. तसेच पोलीस निरीक्षक उदय खंडेराय सोबत होते असे खात्रीलायक सूत्र सांगतात. पण पोलीस प्राथमिकी मध्ये हि बाब अस्पष्ट आहे.
घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ जखमी आरोपीला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. घटनास्थळी पंचनामा करून फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.पोलिसांवर जीवघेणा हल्ला, सरकारी कामात अडथळा तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हि तक्रार पोलीस उप निरीक्षक मिलिंद सोनकांबळे यांनी दिली आहे. या घटनेत पोलिसांच्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे व संशयास्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांना द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अनिकेत उर्फ सोनू कल्याणकरच्या खूनप्रकरणात भाग्यनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या एफ आय आर मध्ये तुरुंगात असणारा मुक्तेश्वर उर्फ गोलू मंगनाळे,त्याचे वडील विजयचंद्र मंगनाळे,अंकुश गदपवाड, रोहित लोट,मधुसूदन जोगदंड,पियुष शिंदे,अश्या सात जणांची नावे आरोपी या सदरात आहेत. त्यातील एक अंकुश दवाखान्यात उपचार घेत आहे.
संबंधित बातमी ….
एलसीबीचे पोलीस निरीक्षक हजर… तरी गोळी पोलीस उपनिरीक्षकाची का ?
Post Views: 137
