आखातातील युद्धामुळे डांबरटंचाईने 24 हजार किमी रस्त्यांची कामे रखडणार:महिनाभरात प्रतिटन 30 हजारांनी दरवाढ, आखाती देशातून आयात ठप्प

0
orig_new-project-2026-04-07t070251391_1775525559.jpg



अमेरिका, इस्रायल व इराण यांच्यातील युद्धाचा परिणाम आता थेट विकासकामांवर होताना दिसतो आहे. आखाती देशातून रस्त्यांसाठी आयात होणारा डांबराचा पुरवठा थांबला आहे. त्यामुळे डांबराची किंमत 2 महिन्यांत ३० हजार रुपये प्रति टन वाढली आहे. एकीकडे कमी पुरवठा अन् द

.

रस्त्यांसह अन्य कामांसाठी भारतात डांबराची वार्षिक मागणी सुमारे ९० लाख टन आहे. यापैकी सुमारे ४० ते ४५ टक्के माल हा इराणसह आखाती देशांकडून आयात केला जातो. इराण हा भारताचा सर्वात मोठा डांबर पुरवठादार आहे. परंतु सागरी मार्ग बंद झाल्याने त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. मागणी जास्त पुरवठा कमी असल्याने किमती वाढल्या आहेत.

वाढीव दरात डांबर खरेदी परवडेना

राज्य शासनाने गेल्या तीन वर्षापासून कंत्राटदारांची बिले अदा केलेली नाहीत. त्यात सर्वच साहित्य क्रेडीटवर खरेदी करणे आता अडचणीचे झाले आहे. जानेवारीत ५४ हजार मेट्रिक टन डांबराचे दर आता ८४ हजारांवर पोहोचले आहेत. टनामागे करासह तब्बल ३० हजारांची वाढ झाल्याने वाढीव दरात खरेदी करणे परवडत नाही. यामुळे राज्यातील २४ हजारापेक्षा जास्त लांबीचे सर्व विभागांकडील डांबरीकरणाचे काम मंदावले आहे. – मिलिंद भोसले, राज्य अध्यक्ष, राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना.

कंत्राटदारांनी काम बंद आंदोलन पुकारल्यामुळे कामे थांबण्याची शक्यता

जळगाव जिल्ह्यात सुमारे ४५० किमीची डांबरी रस्त्यांची कामे सुरू आहेत. डांबराचे दर वाढले तरी ठेकेदारांना वाढीव दराने खर्च मिळतो. परंतु पुरवठा न झाल्यास त्याचे परिणाम होऊ शकतात. ठेकेदारांच्या काम बंद आंदोलनामुळे कामे थांबण्याची शक्यता आहे. – प्रशांत सोनवणे, अधीक्षक अभियंता, पीडब्ल्यूडी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed