दिव्य मराठी ग्राउंड रिपोर्ट:पोर्टेबल मशीन चायना मेड, अचूक काही कळत नव्हते, तरीही करत होते गर्भपात, कारमध्ये व्हायची तपासणी, जागा बदलून करायचे गर्भपात, फिरते नेटवर्क

0
orig_new-project-2026-04-07t071828051_1775526599.jpg



सातारा-देवळाई परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदा गर्भपात रॅकेटचा तपास जसजसा पुढे सरकत आहे तसतसे काळजाचा थरकाप उडवणारे वास्तव समोर येत आहे. केवळ पैशांच्या हव्यासापोटी या टोळीने माणुसकीची हद्द ओलांडली होती. धक्कादायक म्हणजे ही टोळी ज्या मशीनने सोनोग्राफी क

.

विशेष म्हणजे या भागात अशा प्रकारचे भयावह कृत्य सुरू असल्याची कल्पनादेखील आजूबाजूच्या लोकांना नव्हती. अचानक पोलिसांनी छापा टाकल्यानंतर हा प्रकार उघड झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. पोलिस आणि मनपाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या. तेथे जे साहित्य सापडले ते एखाद्या सुसज्ज हॉस्पिटलच्या ऑपरेशन थिएटरमध्ये असणारे आहे. सलाइन, गर्भपाताच्या प्रतिबंधित गोळ्या, रक्तस्राव थांबवणारी आणि कळा येणारी इंजेक्शन्स, योनीमार्गातील अडथळे दूर करणारी सर्जिकल साधने पाहून तपास करणारी टीमदेखील अवाक् झाली.

सिल्लोड येथील डॉ. विकास आहेरला अटक

छत्रपती संभाजीनगर | सातारा-देवळाई परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भपात रॅकेट प्रकरणात लिंगनिदान करून महिलांना एजंटकडे पाठवणारा सिल्लोड येथील डॉ. विकास आहेर याला पोलिसांनी सोमवारी (६ एप्रिल) बेड्या ठोकल्या. दरम्यान, मुख्य आरोपी ज्योती पवार हिच्या देवळाईतील घरावर पोलिसांनी छापा टाकला. तेथून गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या प्रतिबंधित गोळ्यांचा मोठा साठा, तपासणीची उपकरणे आणि सर्जिकल साहित्य जप्त करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने १३ एप्रिलपर्यंत (७ दिवस) पोलिस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, सहायक सरकारी वकील सविता हिवराळे यांनी न्यायालयात गेल्या दीड वर्षांत नेमके किती गर्भपात झाले? भ्रूणांची विल्हेवाट कशी लावली जात होती? प्रतिबंधित औषधांचा पुरवठा कोण करत होते याचा सखोल तपास होणे बाकी आहे.

परत येताना तेथे बाहुलीसारखे दिसले

“सकाळी आम्ही या परिसरात काम करत होतो. १० मिनिटांपूर्वीच रस्त्यावरून गेलो, तेव्हा तेथे काहीही नव्हते. मात्र, थोड्या वेळाने परत येताना तेथे बाहुलीसारखे काहीतरी पडलेले दिसले. जवळ जाऊन पाहिले असता ते लहान अर्भक असल्याचे लक्षात येताच पोलिसांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली.

या पैशांतून सुरू लक्झरी लाइफ

आरोपी ज्योती पवार ही खासगी रुग्णालयात काम करायची, मात्र या अवैध धंद्यातून तिने स्वतःची कार आणि घर खरेदी केले असल्याचे समोर आले आहे. आरोपी वर्षा हिच्या कायम संपर्कात होते. महागडे कपडे, ब्रँडेड मोबाइल आणि उच्च दर्जाचे राहणीमान होते. त्या मोठ्या घरातच ऑपरेशन थिएटर सुरू असल्याचेदेखील तपासात समोर आले आहे. या घरालादेखील पोलिसांनी कुलूप लावले होते.

मुकुंदवाडीतील राजनगर भागातील रस्त्यावर अर्भक फेकून अज्ञात पसार

छत्रपती संभाजीनगर | एकीकडे रॅकेटचा तपास सुरू असतानाच, मुकुंदवाडीतील राजनगर भागात सोमवारी सकाळी ११ वाजेच्या सुमारास ४ ते ५ महिन्यांचे अर्भक रस्त्यावर बेवारस अवस्थेत आढळले. सहायक पोलिस निरीक्षक संजय बहुरे यांनी घटनास्थळी धाव घेत अर्भक ताब्यात घेतले आणि पुढील तपासणीसाठी घाटी रुग्णालयात रवाना केले. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल केला.

एजंटचे जाळे : डॉ. विकास आहेर हा निल्लोडमधून महिलांना शहरात ज्योती पवार आणि वर्षा जाधव या परिचारिकांकडे पाठवण्याचे काम करायचा.

जागा बदलण्याची शक्कल : कारवाई टाळण्यासाठी या महिला एकाच ठिकाणी गर्भपात न करता सतत जागा बदलत असत. कधी कधी तर नातेवाइकांनाच “जागा ॲरेंज’ करायला लावली जायची.

महिलेकडे मायेचे प्रतीक म्हणून पाहिले जाते. आईपणाचे महत्त्व जाणणाऱ्या या महिलांनीच हा गोरखधंदा पैशांसाठी सुरू केला होता. सुरक्षित गर्भपातासाठी किमान ८ तास लागतात, मात्र पोलिसांनी पकडू नये म्हणून रक्तस्राव सुरू असतानाही अवघ्या २ तासांत ही जीवघेणी प्रक्रिया उरकली जायची.

हा निव्वळ फसवणुकीचा धंदा

पोर्टेबल मशीनच्या स्क्रीनवर बाळ मुलगा आहे की मुलगी हे सामान्य व्यक्तीला समजू शकत नाही. हे तोतया डॉक्टर याचाच फायदा घेतात. अनधिकृत ठिकाणी गर्भपात केल्याने गर्भपिशवी फाटू शकते किंवा महिलेचा जीव जाऊ शकतो. -डॉ. श्रीनिवास गडप्पा, प्रसूती विभागप्रमुख, घाटी

दिव्य मराठी इनसाइड स्टोरी

या संपूर्ण रॅकेटचे मुख्य केंद्र सिल्लोड तालुक्यातील निल्लोड हे गाव होते. ७० हजार रुपये ठरले की साखळी पद्धतीने वाटणी व्हायची. अशा प्रकारच्या गुन्ह्यात यापूर्वी पोलिसांच्या ताब्यात आणि वाळूज छाप्यात अटक असलेला कुख्यात डॉ. सुनील राजपूत हा डॉक्टर १५ हजार रुपये घेऊन पोर्टेबल मशीनसह गरोदर महिलेच्या घरी जायचा. मुलगा असला तरी मुलगी असल्याचे सांगून तो महिलांना गर्भपातासाठी प्रवृत्त करायचा अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

१. पुरवठादार कोण?: गर्भपातासाठी लागणाऱ्या प्रतिबंधित गोळ्या आणि सर्जिकल साहित्य या टोळीला कोण पुरवत होते? २. प्रशिक्षण : गलिच्छ आणि धोकादायक परिस्थितीत गर्भपात करण्यासाठी या महिलांना कुणाकडून ट्रेनिंग मिळत होते? ३. दलाल सक्रिय : शहरात आणि ग्रामीण भागात या महिलांकडे गरोदर मातांना पाठवणारे नेमके किती दलाल सक्रिय आहेत?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed