समाजात एकोपा, प्रगतीसाठी डॉ. आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंचे विचार केंद्रस्थानी ठेवा:आंबेडकरी मातंग परिषद
![]()
प्रतिनिधी | सोलापूर दलित चळवळीत मातंग समाजाचे योगदान आहे. समाजात एकोपा, प्रगतीसाठी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श, विचार केंद्रस्थानी ठेवा, आचरण करा असे विचार विविध मान्यवरांनी याप्रसंगी बोलताना मांडले. भगवान गौतम बुध्द, शाहू, फुले,आंबडेकर यांचा वारसा जपा असा संदेश देण्यात आला. रविवारी डॉ. फडकुले सभागृहात “आंबेडकरी मातंग परिषद’ सोलापुरात पार पडले. राज्यभरातून आलेल्या मान्यवरांनी विचार मांडले. पुण्याचे ज्येष्ठ विचारवंत रमेश राक्षे यांच्या हस्ते उद॰घाटन झाले. कोल्हापूरचे विचारवंत प्रा. शरद गायकवाड अध्यक्षस्थानी होते. परभणीचे विकास पाथरीकर, अंबाजोगाईचे अशोक पालके, पंढरपूरचे सुनील अडगळे, श्रीकांत कसबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पहिल्या सत्रात या मान्यवरांनी “बहुजन महापुरुषांच्या चळवळीत मातंग समाजाचे सक्रीय योगदान व सदयस्थिती’ या विषयावर मते मांडली. आयोजक जिल्हाध्यक्ष युवराज पवार यांनी प्रस्तावनेत विचार मांडताना म्हणाले,””दलित चळवळीत मातंग समाजाचे मोठे योगदान आहे. {रमेश राक्षे- जागृती आवश्यक आहे. महिलांची संख्या अशा कार्यक्रमात वाढली पाहिजे. कारण विचारांचा प्रसार त्यांच्याकडूनच शक्य आहे. तळागाळात विचार गेल्यानंतरच चळवळ उभी राहील. विकासासाठी सगळ्यांनी एकत्र यावेत. {विकास पाथरीकर- प्रतिकूल परिस्थितीतही मातंग समाज नेहमी योगदान देत आलाय. लहुजी साळवे, मुक्ता साळवे यांचे कार्य स्मरण ठेवा. शिक्षण, आरक्षण याबाबत जागृत पाहिजे. डॉ. बाबासाहेब व अण्णाभाऊ साठे यांचे विचार डोळ्यासमोर ठेवा. जागतिकीकरण, उदारीकरण वाढताना, जगण्याचे प्रश्न गंभीर होत आहेत. काही करायला जा रांगा वाढत आहेत. याला विकास म्हणायच का? {सुनील अडगळे – समाजातील गरजूंना मदत करा. अनेकजण मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. सोशल मिडीया व अन्य माध्यमातून जग जवळ आलं म्हणतो. पण, गरीबांची व्यथा आपणाला कळाली का? , नाही असे उत्तर आहे. प्रगतीसाठी आपण लढा. ३१ डिसेंबर १९३७ साली डॉ. आंबेडकर करकंब गावात आले होते. त्याप्रसंगी मातंग समाजाला प्रबोधन केल्याची आठवण सांगितली. { अशोक पालके – मुक्ता साळवे यांचे विचार पुढच्या पिढीकडे नेण्याची गरज आहे. आदर्श आपल्यासमोर राहावा. सामाजिक बांधिलकी जपा. शिक्षणाला महत्व दया.
