[ads1]
नांदेड- येथील ज्येष्ठ साहित्यिक अनुरत्न वाघमारे लिखित धुक्याची दुलई या प्रवासवर्णनपर पुस्तकाचा प्रकाशन सोहळा येत्या रविवारी २७ सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता हाॅटेल विसावा येथे आयोजित करण्यात आला असून येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा ४३ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. सुरेश घुले हे राहणार आहेत तर या पुस्तकावर फुले आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत सविस्तर भाष्य करणार आहेत तसेच उपप्राचार्य प्रल्हाद हिंगोले यांची विशेष उपस्थिती राहणार आहे, अशी माहिती प्रकाशन सोहळा समितीचे अध्यक्ष नागोराव डोंगरे, कार्यवाह रणजित गोणारकर यांनी दिली.
येथील अकथ प्रकाशनाने धुक्याची दुलई हे पुस्तक प्रकाशनास सिद्ध केले असून प्रकाशन संस्थेच्या वतीने शहरातील शिवाजी नगर स्थित हाॅटेल विसावा पॅलेस येथे हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर एकशे बाराव्या काव्यपौर्णिमा हा कविसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. या कविसंमेलनाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली येथील सुप्रसिद्ध कवयित्री तथा अक्षरोदय साहित्य मंडळाच्या राज्याध्यक्षा सिंधुताई दहिफळे या राहणार आहेत तर अतिथी कवी म्हणून सिरसाळा जि. बीड येथील गोविंद पाठक, उमरखेड जि. यवतमाळचे कवी गीतकार सुमेध घुगरे, परभणी येथील सुप्रसिद्ध कवी शंकर माने, लातूर येथील लेखक कवी प्रा. पंढरी बनसोडे यांची उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यास व कविसंमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Post Views: 172
[ads2]
















Leave a Reply