Marathi Actor Vikas Samudre Facebook Post Suicide Scare; Mumbai Police Alert

[ads1]

मराठी मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि नंतर तितकाच नाट्यमय प्रकार समोर आला आहे. ‘नवरा माझा नवसाचा’ फेम प्रसिद्ध अभिनेते विकास समुद्रे यांच्या एका फेसबुक पोस्टमुळे संपूर्ण मराठी सिनेसृष्टी, त्यांचे चाहते आणि अगदी मुंबई पोलिसांचीही मोठी धावपळ

.

काय होती ती पोस्ट?

विकास समुद्रे यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंटवरून अचानक “I am committing Suicide…” (मी आत्महत्या करत आहे) अशी पोस्ट पडली. या पोस्टने सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली. चाहत्यांनी तातडीने कमेंट्सचा पाऊस पाडत त्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू केला. ही बाब सायबर सेल आणि मुंबई पोलिसांपर्यंत पोहोचताच, सायबर विभागाचे डीसीपी बजरंग बनसोडे यांनी स्वतः या प्रकरणाची गंभीर दखल घेत तातडीने विकास समुद्रे यांच्याशी संपर्क साधला.

टायपिंग मिस्टेकने केला गोंधळ!

पोलिसांनी समुद्रे यांच्याशी संपर्क साधला तेव्हा एक वेगळेच आणि सुटकेचा निःश्वास टाकणारे वास्तव समोर आले. विकास समुद्रे यांनी स्वतः स्पष्ट केले की, ही सर्व एक ‘टायपिंग मिस्टेक’ होती. त्यांना खऱ्या अर्थाने “I am doing drama…” (मी नाटक करत आहे) असे लिहायचे होते, पण ऑटो-करेक्ट किंवा टायपिंगच्या चुकीमुळे तिथे ‘सुसाईड’ (आत्महत्या) असा शब्द टाइप झाला आणि पोस्ट झाली. ते पूर्णपणे सुरक्षित आणि सुखरूप असून त्यांनी असा कोणताही प्रयत्न केलेला नाही, हे समजल्यावर पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला.

चाहत्यांचा जीव टांगणीला आणि नव्या पोस्टने खुलासा

पहिली पोस्ट पडल्यानंतर चाहत्यांनी अत्यंत काळजीत पडत प्रतिक्रिया दिल्या. “अडचण असू शकते, पण हा मार्ग योग्य नाही, प्लीज असं काही करू नका…”, “सर, काय झालं? आपण काहीतरी मार्ग काढू शकतो… एवढ्या टोकाचं पाऊल उचलू नका…” अशा कमेंट्सने कमेंट बॉक्स भरून गेला होता.

यानंतर विकास समुद्रे यांनी स्वतः दुसरी पोस्ट करून खुलासा केला. त्यांनी लिहिले: “I m comiting suicide … अशी माझी पोस्ट टायपिंग errors मुळे झाली … I m doing drama अशी पोस्ट करायची होती मला. काळजी नसावी .. मी सुरक्षित आहे … Thanks for ur love.”

या खुलाशानंतर चाहत्यांनी त्यांना “सर, तुम्ही आम्हाला खूप घाबरवले, आम्हाला तुमची गरज आहे, दीर्घायुषी भव,” अशा प्रतिक्रिया दिल्या. तर एकाने गमतीत म्हटले की, “विकास, खूप फरक आहे दोन वाक्यात. असो… समुद्रा पुन्हा एक मनोरंजनाची सुनामी घेऊन ये.”

ब्रेन हॅमरेजशी झुंज आणि कमबॅक

विकास समुद्रे हे गेली अनेक वर्षे मराठी सिनेसृष्टीत आणि नाटकांमध्ये विनोदी भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. ‘नवरा माझा नवसाचा’ मधील त्यांच्या भूमिकेला मोठी लोकप्रियता मिळाली होती. मात्र, काही वर्षांपूर्वी त्यांना ब्रेन हॅमरेज (ब्रेन स्ट्रोक) झाला होता. नुकतेच एका पॉडकास्टमध्ये त्यांनी त्या अत्यंत कठीण आणि कटू काळातील आठवणी शेअर केल्या होत्या. या आजारपणामुळे ते काही वर्षे इंडस्ट्रीपासून दूर होते. सुदैवाने, ते आता या आजारातून सावरले असून त्यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे.

———-

हेही वाचा…

दिशा सालियन प्रकरणात सीबीआयची एन्ट्री:आदित्य ठाकरेंचा युक्तिवाद फेटाळला, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर वडिलांचा जबाब नोंदवला

दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूप्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या अनुषंगाने दिशाचे वडील सतीश सालियन यांनी सीबीआय कार्यालयात जाऊन आपला जबाब नोंदवला. तब्बल चार तासांच्या प्रक्रियेनंतर ते सीबीआय कार्यालयातून बाहेर पडले असून, लवकरच याप्रकरणी रीतसर गुन्हा दाखल होईल, अशी माहिती त्यांचे वकील निलेश ओझा यांनी दिली. येथे वाचा संपूर्ण बातमी

[ads2]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *